नवीन अपडेट – SET परीक्षेची तारीख जाहीर; 26 मार्च 2023 ला पार पडणार परीक्षा | Pune University SET Exam

0

Pune University SET ExamSET exam dates has declared by the Savitribai Phule Pune University. The exam will be held on the 26th of March 2022 by Savitribai Phule Pune University. Further details are as follows:-

राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा अर्थात सेटची घोषणा करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २६ मार्च २०२३ रोजी ३८ वी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे. 

Maharashtra SET Exam Pattern And Syllabus PDF -Updated Syllabus PDF 

  • विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची यंदाची तारीख विद्यापीठाने जाहीर केली आहे.
  • ३० नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  • सहायक प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी १९९३ पासून ही परीक्षा घेतली जाते.
  • दरवर्षी साधारणतः सहा टक्के उमेदवार उत्तीर्ण होतात.
  • उमेदवार सहायक पदासाठी पात्र तर ठरतो, मात्र प्रत्यक्ष प्राध्यापक भरती रखडल्यामुळे त्याला मनस्तापच सहन करावा लागतो.

SET Exam 2022

  • पात्रता : कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण आवश्यक (राखीव ५० टक्के). शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
  • परीक्षेचे स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायायी पद्धत. एकूण दोन पेपर घेतले जातात. पेपर १ आणि पेपर २ मधील सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक असते.
  • माध्यम : इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत उपलब्ध

SET Exam : Important Dates 

  • – अर्ज करण्याची अंतिम मुदत:  ३० नोव्हेंबर
  • – विलंब शुल्कासह: ७ डिसेंबर
  • – परीक्षेची तारीख : रविवार, २६ मार्च २०२३

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ:  https://setexam.unipune.ac.in/

मागील सेट

३७ वी सेट परीक्षा

  • तारीख ः २६ सप्टेंबर २०२१
  • एकूण उमेदवार ः ७९,७७४
  • उत्तीर्ण झालेले ः ५,२९७
  • उत्तीर्णांची टक्केवारी ः ६.६४ टक्के
  Maharashtra SET Exam Previous Year Paper With Answer PDF

Previous Update –

नवीन अपडेट – SET परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

Pune University SET Exam: The latest update for SET Exam 2022. As per the latest news, the SET Examination Dates 2022 will be declared soon. With the approval of the University Grants Commission, Savitribai Phule Pune University, on behalf of the State Government, conducts the State Level Eligibility Examination for the candidates of Maharashtra and Goa by the SET Department. Further details are as follows:-

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षेसाठी (सेट) विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परवागी प्राप्त झाली असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी आयोगाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी विद्यार्थी तसेच अनेक विद्यार्थी संघटना यांनी निवेदन दिले होते. मात्र परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता गरजेची असल्याने ही मान्यता मिळविण्यासाठी विदयापीठ प्रयत्नशील होते.

विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी नवी दिल्ली येथे अनुदान आयोगाच्या कार्यालयात भेट देत मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर काहीच दिवसात आयोगाने ही मान्यता दिली असून आता विद्यापीठ पातळीवर परीक्षेच्या नियोजनाची तयारी सुरू झाली आहे

लवकरच विद्यापीठाकडून पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाचे कुलसचिव व सेट परीक्षेचे सदस्य सचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. तसेच मागील वर्षीप्रमाणे यंदाही विदयार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

  Maharashtra SET Exam Pattern And Syllabus PDF
PDF जाहिरात – https://bit.ly/3esLiBW

Previous Post –

Pune University SET Exam 2021 – Date Extended

Pune University SET Exam 2021 : The University Grants Commission has extended the deadline for filing applications for State Eligibility Test (SET) on September 26, 2021 in Maharashtra and Goa to June 17 instead of June 10.

SET Exam – राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या अर्जास मुदतवाढ. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता अनेक उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दरम्यान १८ ते २५ जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्यासाठी सेट विभागाकडून २६ ते ३० जून दरम्यान संधी दिली आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.


Pune University SET Exam 2021 : The date of state-level qualifying examination has been announced by Savitribai Phule Pune University. The set test will be held on September 26, 2021.

राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची तारीख जाहीर. SET 2021: राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची तारीख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ मे २०२१ ते १० जून २०२१ अशी मुदत देण्यात आली आहे.

यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, ३७ वी सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ मे २०२१ ते १० जून २०२१ अशी मुदत देण्यात आली आहे.

  Maharashtra SET Exam Previous Year Paper With Answer PDF

जाहिरात – https://bit.ly/3ye430V


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ SET परीक्षा 2021 जाहिरात

The application for the State Level Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor conducted by Set exam section, Savitribai Phule Pune University is to be made online.

Pune University SET Exam 2021 – सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली सहायक प्राध्यपक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 17 मे 2021 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे. अधिक माहिती खालीप्रमाणे आहे.

  • परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 (SET)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • महत्त्वाच्या तारखा –
    • अर्ज करण्याची तारीख – 17 मे 2021
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2021 
  • अधिकृत  वेबसाईट – www.setexam.unipune.ac.in 
Pune University SET Exam 2021

Table of Contents

Leave A Reply

Your email address will not be published.