शिक्षक भरती : अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त अखेर ठरला; जाणून घ्या MahaTAIT Exam 2022

0

Maha TAIT Exam 2022 

MahaTAIT Exam 2022 : The latest update for Maha TAIT Examination. As per the latest news, the Aptitude and intelligence test will be conduct soon. Aptitude and intelligence test required for teacher recruitment will be conducted online. For this, one of TCS, IBPS and MKCL will be selected. The exam timetable will be declared on 16th of December 2022 from the selected institution. Further details are as follows:-

शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाईनच घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे.

Maha TAIT Exam Dates 

निवड झालेल्या संस्थेकडून 16 डिसेंबरला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर, प्रत्यक्ष परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल 5 मार्च 2023 ला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षेच्या निकषांमध्ये काही आवश्यक सुधारणा करून शासन निर्णय जाहीर करण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल हे परीक्षा कसे घेणार, याचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे. परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. निवडलेल्या संस्थेला परीक्षेची तयारीकरिता 4 महिने वेळ लागेल. त्यामुळे 17 फेब-ुवारी 2023 पासून परीक्षेला सुरुवात होईल.

  • राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला आहे.
  • त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.
  • त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
  • परंतु, डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही.
  • संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परिषदेकडे नाही.
  • परंतु, शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन, तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या.
  • त्याचपध्दतीने फेब-ुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पार पडणार आहे.

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परीक्षेसाठी कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया शासन निर्देशानुसार पार पडेल. त्यानंतर लवकरच परीक्षेेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
– शरद गोसावी, प्रभारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 

Maha TAIT Exam 2022

नवीन अपडेट – शिक्षक अभियोग्यता चाचणी होणार, बाह्य यंत्रणेद्वारे परीक्षेस मंजुरी!! Maha TAIT Exam 2022

Maha TAIT Exam 2022 : The Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test will be soon for the Teachers Recruitment. The Education Department has approved the exam conducted online. However, since the education department does not have a competent system to conduct this examination, the examination will be conducted through an external system by conducting a tender process. Further details are as follows:-

  MahaTAIT Exam Syllabus & Exam Pattern PDF Download : महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा MH SET मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेतील पात्र उमेदवारांची अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) घेतली जाते. मात्र 2017 नंतर मागील चार वर्षांत ही परीक्षा घेतलेली नाही. यंदा शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे.

  • यंदा फेब्रुवारी महिन्यात अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात येईल अशी अपेक्षा होती.
  • मात्र टीईटी परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर ही परीक्षा लांबणीवर पडली.
  • खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या गुणांआधारे करण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला.
  • त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले.
  • सहा महिन्यांत एकदा किंवा दरवर्षी ही परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यानंतर महाआयटी आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत डिसेंबर 2017 मध्ये परीक्षा घेण्यात आली.
  • यंदा मात्र परीक्षा परिषदेकडे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा उपलब्ध नाही.
  • त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) चे आयोजन करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या पॅनलमधून निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे.

जागा रिक्त असूनही आता पंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याने पात्र उमेदवारांचे नुकसान होत आहे. तसेच शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत आहे. याचा विचार करून या परीक्षेचे लवकरात लवकर आयोजन करावे, अशी मागणी डीएलएड आणि बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली.


शिक्षकांच्या भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता चाचणी कधी? – Maha TAIT Exam 2022 

Maha TAIT Exam 2022 : The exam was conducted in December 2017 by MahaIT and State Examination Council. In the subsequent four years, this exam has not been conducted even once. Further details are as follows:-

राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीला चार वर्षांत मुहूर्तच मिळालेला नाही. यंदा फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परीक्षेची काहीच चिन्हे दिसत नसल्याने परीक्षा कधी होणार, होणार की नाही या बाबत राज्यभरातील उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.

  • राज्यातील खासगी, अनुदानित शाळांतील शिक्षकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला.
  • त्यासाठी पवित्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली.
  • सहा महिन्यांतून एकदा किंवा दरवर्षी ही परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.
  • त्यानुसार डिसेंबर २०१७ मध्ये महाआयटी आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे ही परीक्षा घेण्यात आली.
  • त्यानंतरच्या चार वर्षांत ही परीक्षा एकदाही झालेली नाही.
  • यंदा फेब्रुवारीमध्ये परीक्षा आयोजित करण्यासंदर्भातील सूचना तत्कालीन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना शासनाकडून देण्यात आल्या होत्या.
  • ऑफलाइन पद्धतीने दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार होती.
  • मात्र परीक्षा घेण्यासाठी यंत्रणेची निवड प्रक्रिया अद्याप झालेली नसल्याने परीक्षा होणार की नाही, या बाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे.
  After gap of 4 years, MahaTAIT postponed

राज्यात लाखो बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्य शासनाने आता अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घ्यायला हवी. गेल्या चार वर्षांत केवळ एकदाच ही परीक्षा झाली. शिक्षकांच्या जागा रिक्त असूनही आता कंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याने उमेदवारांचे नुकसान होत आहे. तसेच शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा विचार करून तातडीने या परीक्षेचे आयोजन करायला हवे, असे डीटीएट बीएड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायची, या बाबतचा निर्णय शासन स्तरावरून होणे अपेक्षित आहे.

– शरद गोसावी, प्रभारी अध्यक्ष, परीक्षा परिषद


Maha TAIT Exam 2022 

Maha TAIT Exam 2022 : It was decided in 2017 to recruit teachers in the state through the sacred portal. In December of the same year, the first aptitude test for teacher recruitment was held. However, four years later, no further aptitude test has been conducted by the government. Further details are as follows:-

राज्यात शिक्षकभरती पवित्र पोर्टलमार्फत घेण्याचा निर्णय २०१७ मध्ये करण्यात आला होता. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यातच पहिल्यांदा शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता परीक्षाही घेण्यात आली. मात्र त्यानंतर चार वर्षे उलटून गेली तरीही शासनाकडून पुढची अभियोग्यता परीक्षा घेण्यात आलेली नाही. नुकतेच उघड झालेले टीईटी पेपरफुटी प्रकरण आणि रखडलेली परीक्षा यामुळे उमेदवार हवालदिल झाले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२१ मध्ये फेब्रुवारीतच अभियोग्यता परीक्षा घेण्याबाबत पत्राद्वारे सूचना केली होती. मात्र, टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे फेब्रुवारीचा मुहूर्त टळला. या बद्दल उमेदवार मोहम्मद शेख म्हणाले,‘‘पेपरफुटी प्रकरणामुळे आतापर्यंत टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. आता एप्रिलमध्ये दुसरी अभियोग्यता परीक्षा घेण्यात येणार असल्याची सूचना फेब्रुवारीमध्ये उमेदवारांना पवित्र पोर्टलवरच देण्यात आली होती. परंतु अद्याप त्याबाबत कोणतीही जाहिरात काढण्यात आलेली नाही. म्हणून आता एप्रिलमध्ये परीक्षा घेणे शक्य आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.’’ राज्यातील लाखो पात्र उमेदवार परीक्षेच्या प्रतिक्षेत असून, वारंवार परीक्षा पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. या रखडलेल्या अभियोग्यता परीक्षेसंदर्भात शिक्षण आयुक्तांची भेट घेण्यात आल्याचे एमपीएससी समन्वय समितीचे राज्य संघटक सुरेश सावळे यांनी सांगितले आहे.

  TAIT चा अर्ज करण्यासाठी 4 दिवस मुदतवाढ - CTET Appear वाले अर्ज करू शकतात - शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी जाहिरात प्रकाशित ; अर्ज सुरु, हि माहिती काळजीपूर्वक भरा !! MahaTAIT Exam 2023

Shikshak Bharti TAIT Exam Updates

अभियोग्यता चाचणी… 

The second test to be taken after passing the Teacher Eligibility Test (TET) is the ‘Aptitude and Intelligence’ test. Recruitment will now be based on the marks in this test. In the first aptitude test in December 2017, more than two and a half lakh DAD and BEAD candidates were eligible. Candidates must pass both these examinations to be eligible for recruitment.

राज्यात प्रथमच २०१७ मध्ये ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत परीक्षा झालीच नाही, म्हणून नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रकही तातडीने जाहीर करावे.

– शुभम तिडके, उमेदवार

टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये या आधीच्या परीक्षा एजन्सी आणि संबंधितांचा सहभाग आहे का नाही, याची चौकशी चालू आहे. संपूर्ण तपासानंतरच आलेल्या तथ्यांच्या आधारे परीक्षेसंदर्भातील पुढचा निर्णय घेण्यात येईल.

– सुरज मांढरे, राज्याचे शिक्षण आयुक्त

टीईटी उत्तीर्ण झालेले उमेदवार

  • वर्ष : पेपर १ – पेपर २ – एकूण
  • १)२०१४-२५६३-७०३२-९५९५
  • २) २०१५ – १९०३-७०८६-८९८९
  • ३) २०१७- ७४४५- २९२८-१०३७३
  • ४) २०१८ – ४०३०-५६४७-९६७७
  • ५) २०२०-१०४८७-६१०५-१६५९२
  • (२०१६,२०१९ ला परीक्षा झाली नाही)
Leave A Reply

Your email address will not be published.