https://Mahatait.in

Mahatait

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ हजार ५६ पदांची भरती लवकरच होणार ! Department Of Medical Education And Medicine Bharti 2023

0

Department of Medical Education and Medicine Bharti 2023: Proposal for filling up of approved notional posts in Group “C” and Group “D” for Government Medical, Ayurveda and Homoeopathic Colleges and Hospitals under Directorate of Medical Education and Research through external sources from Commissioner, Directorate of Medical Education and Research, Mumbai has been received by Govt. Accordingly, a total of 5056 posts of skilled, unskilled and semi-skilled in Group C and Group D cadres in 27 institutions are to be recruited through external sources. This will be one of the Biggest Recruitment in Maharashtra State. More information about Department of Medical Education and Medicine Bharti 2023 are given below:

So those who wants to make their career in medical Field , be ready to apply for Medical Department Maharashtra Bharti 2023. Government Medical Ayurveda, Homeopathic Colleges and Hospitals under Directorate of Medical Education and Research will be filled on contractual basis.

खुशखबर !! शासनाने राज्यातील २७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ हजार ५६ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयांकरिता गट क ड संवर्गातील मंजूर पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती खाली वाचा…

Department Of Medical Education And Medicine Bharti 2023

Department Of Medical Education And Medicine Bharti 2023


वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी ही पदे कंत्राटे पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला शासनाने जानेवारी रोजी मंजुरी दिली. त्यानुसार २७ संस्थांमधील गट क आणि ड या संवर्गातील कुशल, अकुशल, अर्धकुशल अशी ५ हजार ५६ पदे भरली जातील. २० ते ३० टक्के बचतीची अपेक्षा ही नियमित पदे भरल्यास जितका खर्च झाला असता त्या खर्चाच्या कमीत कमी २० ते ३० टक्के इतकी बचत कंत्राटी कर्मचारी भरल्यानंतर होणे अपेक्षित आहेत. सेवापुरवठादारांशी करारनामा करताना या सूचनांचे पालन करण्याचे शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला आदेश दिले आहेत.

Department of Medical Education and Medicine Vacancy 2023

अन्य जिल्ह्यांच्या पदांचा तपशील बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

Read Full GR


Medical Department Maharashtra Bharti 2023

Department of Medical Education and Medicine Bharti 2023 –  Maternal and child health, health services in tribal areas and mental illness are increasing day by day. Doctors in the health department said that there is an immediate need to fill up the posts from doctors to clerks in view of the increasing vacancy in the health department. Finally today the state government has taken a decision in this regard. 1432 posts of senior resident doctors have been sanctioned in the state. The state government has recently taken a decision to fill this posts through Maharashtra Senior Resident Recruitment 2023. For More Update, you can read below information

सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. मार्डने महाराष्ट्रात पुकारलेल्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वरिष्ठ निवासी संवर्गातील 1 हजार 432 पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टरांवरील ताण निम्म्याने कमी होणार आहे.

Department Of Medical Education And Medicine Bharti 2023

Maharashtra Senior Resident Recruitment 2023 | Mumbai Doctor Bharti 2023

अवघ्या दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती दोन दिवसांत करण्याचे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता केल्याने आता डॉक्टरांनीही समाधान व्यक्त केले आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील जवळपास 7 हजार निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. राज्याच्या आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यात यावी ही देखील या डॉक्टरांनी प्रमुख मागणी होती. संपादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संपकरी डॉक्टरांसोबत चर्चा करून दोन दिवसांत राज्यातील निवासी डॉक्टरांची 1432 रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला होता. त्यामुळे राज्य शासनाने आज ही रिक्त पदे भरण्याची घोषणा केली आहे.

डॉक्टरांच्या मागण्या

1,432 एसआर पदांची निर्मिती, वसतिगृहांची दुरूस्ती, वसतिगृहांची क्षमता वाढवणे, महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार अदा करा, सहयोगी तसेच सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरा, यासह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. यातील निवारी डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे.

माता आणि बाल आरोग्य, आदिवासी भागातील आरोग्य सेवा तसेच मानसिक आजाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या कमाची वाढती व्याप्ती लक्षात घेता ताबडतोब डॉक्टरांपासून लिपीकांपर्यंतची पदे भरण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे होते. अखेर आज राज्य शासनाने या बाबतचा निर्णय घेतला आहे.

राज्यभरात आरोग्य विभागाची 527 रुग्णालये आहेत. या सर्व रूग्णालयांमध्ये जवळपास 46 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्षाकाठी बाह्यरुग्ण विभागात जवळपास साडेतीन कोटी रुग्णांवर उपचार केले जातात, तर सुमारे 90 हजार छोट्या-माठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त भारत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्लून, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनासह विविध राष्ट्रीय कार्यक्रम, तसेच आरोग्यविषयक राज्य उपक्रम, हिवताव, हत्तीरोग, डेंगी, चिकनगुन्यासह विविध साथरोग, तसेच मधुमेह व रक्तदाबासह असर्गजन्य आजारांपासून कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर आरोग्य विभाग सतत्याने काम करीत आहे. माता आणि बाल आरोग्य, आदिवासी भागातील आरोग्य सेवा तसेच मानसिक आजाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या कमाची वाढती व्याप्ती लक्षात घेता ताबडतोब डॉक्टरांपासून लिपीकांपर्यंतची पदे भरण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे होते. अखेर आज राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.


Department of Medical Education and Medicine Bharti 2023

Department of Medical Education and Medicine Bharti 2023: The latest update for Department of Medical Education and Medicine Recruitment 2023. As per the latest news, the Medical Education and Medicine Department Recruitment will be soon. This recruitment will be conducted by TCS-ION. Further details are as follows:-

सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS-ION द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR 21 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत.

Department Of Medical Education And Medicine Bharti 2023
Department Of Medical Education And Medicine Bharti 2023

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय व अन्न व औषध प्रशासन, मानसिक आरोग्य केंद्र, पुणे अंतर्गत असलेली गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे भरण्याबाबतची प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (T.C.S-ION) या कंपनीमार्फत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

Department Of Medical Education And Medicine Bharti 2023
Department Of Medical Education And Medicine Bharti 2023

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यास तसेच टी. सी. एस- आयओएन (T.C.S-ION) कंपनीसोबत करार करण्यास आयुक्त (वै.शि.) यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच, टी. सी. एस (T.C.S-ION) कंपनीसोबत करार करण्याकरीता आयुक्त (वै.शि.) यांच्या कार्यालयाचे Legal Name :- DIRECTORATE MEDICAL EDUCATION vasa/ नात्रिक अतात्रिक पदे भरणेबाबत २०२० & या MUMBAI Registration नावाचे G.S.T. Number RESEARCH 27MUMD13141CIDI व Tan Number MUMD13141 या प्रमाणपत्राचा वापर करण्यात यावा. सदर भरतीप्रक्रियेसंदर्भात काही बाबींस शासनाची मान्यता घेणे आवश्यक असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (वै.शि.) यांनी वेळोवेळी शासनास सादर करावा. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सुचनांनुसार तसेच, प्रचलित नियमांनुसार भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया आयुक्त, (वैद्यकीय शिक्षण व संशोधन) यांनी राबवावी.

GR प्रकाशित – http://bit.ly/3GNBcY3

Department Of Medical Education And Medicine Bharti 2023

Department Of Medical Education And Medicine Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.