https://Mahatait.in

Mahatait

नवीन अपडेट – 4860 केंद्र प्रमुखांची पदोन्नतीने व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे होणार भरती | ZP Teachers Recruitment

0

ZP Teachers Bharti 2022: The latest update for ZP Pramiry Schools Recruitment. As per the latest news, 50 percent of the posts of Head of Center will be filled by promotion and 50 percent of the posts will be filled through limited departmental competitive examination. Further details are as follows:-

केंद्रप्रमुखाची 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय उक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार एकूण ४८६० केंद्र प्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. 

ZP Primary School Bharti 2022

शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०१० अन्वये केंद्र प्रमुख पद भरतीचे प्रमाण सरळसेवा, पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे अनुक्रमे ४० : ३०:३० या प्रमाणात निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्राम विकास विभागाने दि.१०.०६.२०१४ रोजी अधिसूचनेन्वये केंद्रप्रमुखाचे सेवाप्रवेश नियम प्रसिध्द केले. संदर्भ क्र.८ येथील शासन निर्णयान्वये सदर पदे भरणेबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. परंतु सदर कार्यपध्दतीनुसार पदे भरली जात नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे १०० टक्के पदे भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण बदलून ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ZP Primary School Recruitment 2022

 • केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक १६.०२.२०१८ अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत.
 • केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर, ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Previous Update – ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Recruitment : जि.प.च्या 30 हजार शिक्षकांची भरती होणार!! जाणून घ्या सविस्तर माहिती

ZP Teachers Bharti 2022: Zilla Parishad Teachers recruitment 2022 will be soon. कमी पटसंख्या (२० पेक्षा कमी) असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये २९ हजार ६०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत ‘टेट’ होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे. राज्यात जिल्हा परिषदेसह पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास ९७ हजार शाळा असून त्यात सव्वादोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या जवळपास १४ हजार शाळांची पटसंख्या २०पेक्षाही कमी आहे.

 • त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे.
 • त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत.
 • दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत.
 • मागील चार वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही.
 • या पार्श्वभूमीवर आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टीईटी तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
 • फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील.
 • साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे.
 • परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.
 • परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘खासगी’त मुलाखतीद्वारे भरती

टीईटी व टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी देखील ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आहे. भरती करण्यासाठी एका पदासाठी दहा उमेदवारांना बोलावणे आवश्यक आहे. त्यांची मुलाखत घेऊन खासगी संस्थांवर शिक्षक भरती करावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. गुणवत्तेनुसार थेट भरती देखील करण्याचा अधिकार खासगी संस्थांना देण्यात आला आहे. त्याचे रेकॉर्ड संस्थांना जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी जूनपूर्वी मोठी शिक्षक भरती होईल, असेही सांगण्यात आले.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

 • ६०,९१२ – एकूण शाळा
 • ४३,५५,०७० – एकूण विद्यार्थी
 • २,१४,६६० – शाळांवरील शिक्षक
 • २९,६०० – रिक्तपदे

Previous Update – Teachers Bharti 2022

शिक्षकांची तब्बल 1200 पदे रिक्त!! जाणून घ्या सविस्तर माहिती | ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022The latest update for ZP Teachers Recruitment 2022. There are a totla of 1218 teachers posts vacant. Further details are as follows:- गावे-वाड्यांमधील गोरगरिबांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात; परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांवर मोठा ताण पडतो आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शिक्षकांची जवळपास १,२१८ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यात मुख्याध्यापक, उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

 • रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या १६ लाख असून दोन हजारांहून अधिक गावे-वाड्या आहेत.
 • डोंगर-दऱ्यात, दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत.
 • जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या २,६०३ शाळा असून ९५, ९८३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 • या शाळांमध्ये ५,७४९ शिक्षक कार्यरत आहेत. त्यात ४६ मुख्याध्यापक, ४ हजार ७६१ उपशिक्षक, व ९४२ पदवीधर आहेत.
 • मंजूर पदांपैकी तीस टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • तरीदेखील गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक प्रयत्न करीत आहेत.
 • त्यात शासनाच्या वेगवेगळ्या योजना, निवडणुकीची कामे शिक्षकांना करावी लागतात.
 • एकट्या रायगड जिल्ह्यात शिक्षकांच्या ६,९५२ मंजूर पदांपैकी १,२१८ पदे रिक्त आहेत.
 • या रिक्त पदांमुळे जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या कामांवर प्रचंड ताण पडत असून एका शिक्षकाच्या खांद्यावर एक ते दोन शाळांचा भार पडतो आहे; तर काही शिक्षकांना प्रशासकीय कामांत घेतले जात असल्‍याने शाळेतील एका शिक्षकावर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी पडते; तर दुसरीकडे अध्यापनाचे शिक्षण घेऊन हजारो तरुण नोकरीविना बेरोजगार आहेत.
 • सरकारकडून शिक्षकांची भरती करण्यात येत नसल्‍याने बेरोजगारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, तर काही तरुणांनी घरगुती शिकवणी, खासगी क्‍लासमध्ये शिकवण्यास सुरुवात केली आहे.
  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 - (MAHATET 2021) अंतरिम निकाला बाबतचे प्रसिद्धीपत्रक

जिल्ह्यात केवळ ८६ केंद्रप्रमुख

 • शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रप्रमुख असतात.
 • पंचायत समिती व शाळांमधील दुवा म्हणून केंद्र प्रमुखांकडे पाहिले जाते.
 • जिल्हा परिषद व सरकारच्या वेगवेगळ्या योजना, निर्णय यांच्यामार्फत शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे.
 • जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातील दोन तास तासिका घेणे, शाळांची माहिती गोळा करणे, शाळांना मार्गदर्शन करणे अशी कामे असून प्रत्येक केंद्र प्रमुखाकडे १५ शाळांचा भार दिला जातो; परंतु जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची २२८ पदे मंजूर आहेत.
 • त्यापैकी ८६ केंद्र प्रमुख कार्यरत आहेत, तर उर्वरित पदे रिक्‍त आहेत.
 • अपुऱ्या मनुष्यबळामुळे एका केंद्र प्रमुखाकडे सुमारे ३५ शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिक्षकांची रिक्‍त पदे – Zilla Parishad Teachers Vacancy 2022

मंजूर – कार्यरत – रिक्त

 • मुख्याध्यापक – १३० – ४६ – ८४
 • उपशिक्षक – ५,५४६ – ४,७६१ -८००
 • पदवीधर – १,२७६ -९४२ -३३४
 • एकूण – ६,९५२ – ५,७४९ – १,२१८

तालुकानिहाय रिक्‍त पदे

 • अलिबाग – ६७
 • उरण – ३९
 • कर्जत – १४४
 • खालापूर -८३
 • तळा – ५६
 • पनवेल – १६१
 • पेण – ११०
 • पोलादपूर – ७४
 • महाड – ८६
 • माणगाव – ७३
 • मुरूड – ३६
 • म्हसळा – ७७
 • रोहा – ९१
 • श्रीवर्धन – ५४
 • सुधागड – ६७
  • एकूण – १२१८

Previous Update – Teachers Bharti

नवीन अपडेट – जिल्हा परिषद शिक्षकांची 31,472 पदे रिक्त!! ZP Shikshak Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022The latest update for Zilla Parishad Teachers Bharti 2022. As per the latest news, There are a total of 31,472 teacher posts vacant in Zilla Parishad. 2,45,591 teachers’ posts are sanctioned in Zilla Parishad but 31,472 posts are still vacant. Further details are as follows:-

राज्यभरात जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नुकत्याच आंतरजिल्हा बदल्या पार पडल्या. त्यासाठी शिक्षकांचे जिल्हानिहाय रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले होते. या रोस्टरनुसार राज्यात मराठी माध्यमाची १६ हजार ७४८ पदे, तर उर्दू माध्यमाची १ हजार ३०१ पदे रिक्त दाखविण्यात आली होती. अशी राज्यभरात एकूण १८ हजार ४९ पदे रिक्त होती. मात्र, एकाच महिन्यात रिक्त पदांची संख्या १ हजार ४०१ ने वाढल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून पुढे आले आहे.

पुणे येथील प्रदीप दराडे यांनी माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागविली होती. त्यानुसार आता राज्यात जि.प. शिक्षकांची १९ हजार ४५२ पदे रिक्त असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी दिली आहे.३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआर’नुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते.

ZP Teachers Bharti 2022
ZP Teachers Bharti 2022 – MahaTAIT.in

नवीन अपडेट – जिल्हा परिषद शाळांत शिक्षकांची 18 हजार पदे रिक्त!! ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022: There are a total of 18 thousand Teacher posts vacant in Zilla Parishad Schools. There was a ban on teacher recruitment in the state since 2011. It was raised in 2012. The recruitment will be soon. Further details are as follows:-

राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती २०१२ मध्ये उठविण्यात आली. मात्र, साडेतीन वर्षे लोटूनही शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८ हजारांवर पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Zilla Parishad School Teachers Bharti Vacancy Details 

ZP Teachers Bharti 2022
 • ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआरनुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते.
 • सध्या याच पटसंख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी १८ हजारोवर पदे रिक्त आहेत.
 • २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल आणून शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी २०१९ च्या डिसेंबरमध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली.
 • पावणेदोन लाख डीएड, बीएडधारकांनी ही परीक्षा दिल्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या.
 • सध्या कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी.
 • रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे.
  Teachers Recruitment : जि.प.च्या ३० हजार शिक्षकांची भरती होणार-फेब्रुवारीत ‘टेट’ – MahaTAIT Maharashtra Shikshak Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022

जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची 450 पदे रिक्त!! – ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022: There are a total of 450 Teacher posts vacant in Zilla Parishad Schools. The ZP Shikshak Bharti 2022 will be soon. Further details are as follows:-

जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची ४५० पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरती घेण्यात आली नाही. शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. समायोजनाच्या नावावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

 • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • शिकविणारेच अपुरे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत.
 • राज्य सरकारने शिक्षक भरती थांबविल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे.
 • ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे.
 • गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरती घेण्यात आली नाही.
 • भंडारा जिल्ह्यात शिक्षकांचा अनुशेष वाढू लागला आहे.
 • शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.
 • समायोजनाच्या नावावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.
 • ही परिस्थिती असतानाच गेल्या १८ वर्षांपासून घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढविण्यात आले नाहीत.
 • बीए बीएड, पदवीधर तथा अन्य घड्याळी तासिका शिक्षक म्हणून कार्य करीत आहेत.
 • या शिक्षकांना तीन हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन देण्यात येते.
 • समाधानकारक मानधन देण्यात येत नसल्याने गावातील शिक्षित तरुण घड्याळी तासिका शिक्षक म्हणून काम करण्यास नकार देत आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पहिली ते चौथीचे वर्ग एक किंवा दोन शिक्षक सांभाळतात. ही पोकळी भरून काढण्याची क्षमता घड्याळी तासिका शिक्षकांत आहे. राज्य शासनाने शिक्षक भरती थांबविली असली तरी घड्याळी तासिका शिक्षक भरतीकडे पाठ फिरविली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे, घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढविणे गरजेचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘एमपीएससी’ची धास्ती

 • आतापर्यंत शिक्षक बनण्यासाठी डीएड, बीएड व त्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते.
 • परंतु, आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत शासनपातळीवर हालचाली सुरू आहेत.
 • त्यामुळे शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या राज्यातील हजारो तरुणांमध्ये धास्ती पसरली आहे.
 • एमपीएससीचे दिव्य पार केल्यानंतरच पुढे शिक्षक होता येणार आहे.

ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022 : There are a total of 700 Teacher posts vacant in Zilla Parishad Schools. The Education Committee has decided to fill 50 of them. There are 40 Thousand Teacher posts vacant in the State. This includes 27,000 posts in Zilla Parishad schools and 13,000 posts in secondary schools. Further details are as follows:-

Zilla Parishad Shikshak Bharti 2022 | नवीन अपडेट – जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी शिक्षक पदांची भरती लवकरच!!

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मानधनावर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सेस फंडातून 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून 50 शिक्षक नियुक्ती करण्यास समितीने मंजुरी प्रदान केली. या कंत्राटी शिक्षकांना मानधन म्हणून 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या 1518 शाळांमध्ये सातशेवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. बहुतांश दोन शिक्षकी शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. तर काही ठिकाणी एकही शिक्षक नाही.

 • जिल्हा परिषदेच्या शाळेत 2005 पासून शिक्षकांची भरती बंद आहे.
 • त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येत शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • आजच्या घडीला 700च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
 • कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
 • अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. जिल्हा परिषदेने मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्तीचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे.
 • अशा परिस्थितीत त्या शाळेमध्ये शेजारील दोन शिक्षकी शाळेतील एक शिक्षक घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.
 • शासन शिक्षक भरती करेल तेव्हा करेल, परंतु स्थानिक पातळीवर जि. प. ने विद्यार्थ्यांच्या हितार्थ कंत्राटी तत्त्वावर गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • एक शिक्षकी व विषय शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये प्रथम प्राधान्याने कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०१९ दि. १९/०१/२०२० च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्यांच्या अनुशंगाने समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व शास्ती करणेबाबत

ZP Teachers Recruitment 2022

राज्यात 40 हजार पदे रिक्त

 • राज्यात सध्या 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • यात जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार पदांचा समावेश आहे.
 • या जागा टप्प्याटप्प्याने भरण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली असून पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरणार असल्याची माहिती आहे.
 • नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची सुमारे 700 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 50 पदे भरण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.

ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022There are 1594 teachers and 35 center heads working for 402 primary schools in the taluka. However, there are 165 vacancies for Headmaster, Graduate Teacher, Deputy Teacher and Head of Center. Further details are as follows:-

ZP Teachers Bharti 2022 | ZP Teachers Recruitment 2022

खेड तालुक्‍यातपुढील शैक्षणिक वर्षाची जिल्हा परिषदेच्या शाळांची तयारी सुरु झाली आहे. शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याकर भर दिला जात आहे. तालुक्‍यातील 402 प्राथमिक शाळांसाठी 1594 शिक्षक व 35 केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. मात्र, मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक, उपशिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या 165 जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे करोनाच्या कहरानंतर आता शिक्षण क्षेत्रात दर्जा आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

 • खेड तालुका शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला तालुका आहे.
 • अंगणवाडी ते सातवीपर्यंतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा दर्जा सुधारला आहे.
 • शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुका अग्रेसर असतो.
 • यामुळे इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल कमी झाला आहे.
 • दरवर्षी नव्याने 2 ते हजार विद्यार्थी झेडपी शाळेत प्रवेश घेतात. इंग्रजीसह दर्जेदार शिक्षण प्राथमिक शाळांमध्ये मिळत असल्याने झेडपीच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
 • गेल्या पाच वर्षांत तालुक्‍यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्या व त्यातील विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढली होती.
 • सर्वसामान्य पालक मुलाला इंग्रजी शाळांमध्ये पाठवत होता.
 • मात्र, या शाळांची अवाढव्य फी भरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली नाही.
 • केवळ फी वसुली हे एकमेव उद्दिष्ट ठेवून अनेक शाळा सुरु होत्या त्यावर पालकांनी अनेकदा आवाज उठवले.
 • आंदोलने केली मात्र पालकांची दखल शासन घेत नसल्याने आता पालकांमधून या शाळांकडे जाण्याचा कल कमी झाला आहे.

2 years of epidemics and financial planning collapsed. They cannot afford to pay for English medium schools. This has disturbed the parents. Zilla Parishad school buildings in Khed taluka and its physical facilities are satisfactory. Various necessary facilities are provided to the students in the school. In addition, parents are relieved that there is no need for fees.

शहरातील अनेक विद्यार्थी मराठी शाळांमध्ये शिक्षणासाठी जात आहेत. शाळा इमारती, परिसर स्वच्छता, शौचालये, संरक्षक भिंती, इ- लर्निंग सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची सोय होत आहे. तालुक्‍यातील अनेक शाळांची गुणवत्ता इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा जास्त आहे. निसर्ग चक्रीवादळात तालुक्‍यातील अनेक शाळांना फटका बसला. त्या शाळांच्या दुरुस्तीला झेडपीकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. जुन्या जीर्ण 60 शाळांची दुरुस्ती झाली नाही. 138 शाळांमध्ये मुलींसाठी व 120 शाळांमध्ये मुलांसाठी शौचालये नाही. तालुक्‍यात 163 शाळांना गरजेनुसार संरक्षण भिंत बांधल्या नाहीत. 402 शाळांपैकी 34 शाळांमध्ये इ- लर्निंगचे संच नाहीत.

खेड तालुक्‍यात उपशिक्षकांची 1218 पदापैकी 89 पदे रिक्‍त आहेत. पदवीधर शिक्षकांची 314 पदापैकी 23 पदे रिक्‍त आहेत. मुख्याध्यापकांच्या 62 पदापैकी 36 पदे रिक्‍त आहेत. केंद्रप्रमुख 35 पदापैकी 17 पदे रिक्त आहेत. अशी एकूण 1629 पदांपैकी 165 पदे रिक्त आहेत.

ZP Teachers Bharti, Teachers Bharti 2022, Teachers Bharti 2023

Maharashtra Teachers Bharti

Leave A Reply

Your email address will not be published.