https://Mahatait.in

Mahatait

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती! – Mahanagar Palika Bharti 2023

0

Mahanagar Palika Bharti 2023 – Maharashtra Mahanagar Palika Bharti 2023 latest update is published by the State Government. As per the lates news update received, recruitment process for around 40,000 vacancies will begin soon. This will a great opportunity for the job aspirants of Maharashtra. Also there are around 55000 vacancies are there under the Nagar Parishad of Maharashtra. So, Maharashtra Mahanagar Palika Bharti 2023 will begin soon for large number of vacancies.

राज्यातील बेरोजगार आणि ग्रामीण भागातील तरुण तरुणींसाठी शिंदे- फडणवीस सरकारनं सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात पोलीस भरती, तलाठी भरतीनंतर आता तब्बल 40 हजार पदांची भरती होणार आहे. महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती होणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.


CMO Maharashtra
Mahanagar Palika Bharti 2023

राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.


 Mahanagarpalika Bharti 2023: The latest update for Mahanagarpalika Recruitment 2023. As per the latest news, Municipal Corporation Recruitment will begin be soon in various districts of Maharashtra. Large Number of posts of various vacancies are there. Further details are as follows:-

Mahanagarpalika Recruitment 2023 (Mahanagar Palika Bharti 2023)

विविध जिल्ह्यांच्या महानगर पालिकेमध्ये भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. हि भरती अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून भरपूर पदे यात भरण्यात येणार आहे. हि भरती ३१ मे २०२३ च्या आधी पूर्ण करण्याची सूचना विभागांना देण्यात आली आहे. या संदर्भातील र परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समजते.

MahaNagar Palika Bharti 2023
Mahanagar Palika Bharti 2023

Previous Update :  

Municipal Corporation Bharti 2022 

या आस्थापना परिशिष्टावरील मंजूर ७०८२ पदांपैकीही तब्बल २७०० पदं रिक्त असल्याने जेमतेम ४४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फतच महापालिकेला प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकावा लागत आहे. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांवर गेल्यामुळे महापालिकेला रिक्त पदांच्या भरतीलादेखील शासनाकडून परवानगी मिळत नव्हती. करोना काळात आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली.

परंतु, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे या पदांच्या भरतीला अडथळा निर्माण झाला. शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या नियमावलीला शासनाने अंशत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे अग्निशमन विभागातील फायरमनची २०८, आरोग्य-वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स, नर्स आदी साडेतीनशे तसेच अभियंत्यांच्या काही पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • महापालिकेचा ‘ब’ संवर्गात समावेश झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात महापालिकेचा १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.
  • महापालिकेचा हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता.
  • प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर या प्रस्तावालाही चालना मिळाली आहे.

Municipal Corporation Recruitment 2022 

राज्य सरकारकडून हिरवा कंदील

  • गेल्या आठवडयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्षेत्राबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • शासनाच्या या निर्णयानुसार महापालिकेतील या पदाची भरती प्रक्रियादेखील टीसीएस, आयबीपीएसमार्फत राबविण्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात असून, दिवाळीनंतर या पदांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली आहे.
  • त्यामुळे पालिकेच्या नोकरभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.