https://Mahatait.in

Mahatait

शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा!! पदभरती संदर्भात 14 विभागांचे सादरीकरण | State Mega Bharti 2022

0

State Mega Bharti 2022 New Update

State Mega Bharti 2022: The latest update for Maharashtra Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 75,000 posts will be recruited soon in various 29 departments. 14 departments were presented regarding recruitment. Further details are as follows:-

Maharashtra Recruitment 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या. State Mega Recruitment 2022

 • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
 • पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले.
 • रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी भरती होणार आहे.
 • या संदर्भातील जाहिरात जानेवारी २०२३मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल.

दिव्यांग विभाग ३ डिसेंबरपासून

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा विभाग ३ डिसेंबरपासून कार्या‍न्वित होईल. सध्या महाराष्ट्रात ३० लाखांपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात.

अधिसंख्य कर्मचाऱ्यांना लाभ

 • अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा, तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा, त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 • अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाहीदेखील तत्काळ सुरू करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाला यावेळी दिले.

बीएसएनएलला जमीन

 • ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा वाढविण्याचा भाग म्हणून डिजिटल इंडिया मोहिमेस वेग देण्यासाठी राज्यातील दोन हजार ३८६ गावांमध्ये भारत संचार निगम लिमिटेड या केंद्राच्या अखत्यारितील कंपनीस मनोरे उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 • प्रत्येक गावात २०० चौरस मीटर इतकी जमीन मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

थकबाकीबाबत उपसमिती

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या उपसमितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे.

जलसंपदा प्रकल्पांना वेग

 • अमरावती, तसेच नंदुरबार जिल्ह्यांतील दोन जलसंपदा प्रकल्पांच्या कामांचा वेग लवकरच वाढणार आहे.
 • राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या दोन्ही प्रकल्पांच्या खर्चाला सुधारित मान्यता देण्यात आली.
 • या निर्णयामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 • अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली.
 • तर नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या १६९.१४ कोटी खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली.

शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा – State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022The latest update for State Mega Recruitment 2022. Goos news for job seekers. As per the latest news, There are a total of 75 thousand government posts will be recruit soon. Due to this decision taken by the government, the way has been cleared for 75000 posts in 29 departments of the government. Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D recruitment exams outside the purview of Maharashtra Public Service Commission will be conducted through TCS, IBPS companies. Further details are as follows:-

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत काल या 75000 पदांपैकी 2000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले.  

 • आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे.
 • सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.
 • कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते.
 • परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे.
 • त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.

State Mega Bharti Recruitment- Vacancy Details 

कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?

 • आरोग्य खाते : १० हजार ५६८
 • गृह खाते : १४ हजार ९५६
 • ग्रामविकास खाते : ११ हजार
 • कृषी खाते : २ हजार ५००
 • सार्वजनिक बांधकाम खाते : ८ हजार ३३७
 • नगरविकास खाते : १ हजार ५००
 • जलसंपदा खाते : ८ हजार २२७
 • जलसंधारण खाते : २ हजार ४२३
 • पशुसंवर्धन खाते : १ हजार ४७
  • किती जागा रिक्त ?
  • गृहविभाग : ४९ हजार ८५१
  • सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
  • जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९
  • महसूल आणि वनविभाग : १३ हजार ५५७
  • वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२
  • सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२
  • आदिवासी विभाग : ६ हजार ९०७
  • सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१ 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे. ही पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होण्यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी निबंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम केलेल्या विभाग कार्यालयांना सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास, तर सुधारित आकृतिबंध अंतिम न केलेल्या विभाग, कार्यालयांना गट अ, ब, क संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे ८० टक्क्यांपर्यंत भरण्यास मुभा देण्यात आली. मात्र निबंधांतील शिथिलता केवळ १५ ऑगस्ट २०२३ पर्यंतच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 • शासकीय पदभरतीतील ही शिथिलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी १५ ऑगस्ट २०२३पर्यंत लागू राहील.
 • त्यापुढील भरती प्रक्रिया अर्थ विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२च्या शासन निर्णयाप्रमाणे करण्यात येईल.
 • दरम्यानच्या कालावधीत सुधारित आकृतीबंध अद्याप मंजूर करून न घेतलेल्या प्रशासकीय विभागांनी त्यांचा व त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर करण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी, असे अर्थ विभागाने स्पष्ट केले आहे.
 • दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने स्वागत केले आहे.
 • महासंघाच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता याच धर्तीवर आश्वासन दिल्याप्रमाणे प्रलंबित अन्य मागण्यांबाबत तत्परतेने निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केली.
GR डाउनलोड करा – https://bit.ly/3TUnOVQ
State Mega Bharti 2022
State Mega Bharti 2022

जनेतला दिवाळीच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ”गेले दोन वर्ष आपल्यावर निर्बंध होते. मात्र यावर्षी सर्व सण मुक्त आणि मोकळ्या वातारवणात साजरे करत आहोत. सकारात्मक बदल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे, तसेच कामालाही गती मिळाली आहे. महाराष्ट्राकडे सगळे आशेने आणि विश्वासाने पाहू लागले आहेत.”

शिंदे म्हणाले की, पोलीस भरतीला आम्ही सुरुवात केली आहे. 20 हजार पोलीस शिपाईची पदे भरण्याची प्रकारीया सुरु करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील विविध विभागातील 75 हजार पदांची भरती लवकरच भरण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. ते म्हणाले की, आरोग्यासाठी दुप्पट निधी देण्याचा प्रयत्न आहे. राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे औषध केंद्र सुरु करणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरु आहे. वाहतूक आणि औषध खर्चसाठी  प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच नवी मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.  State Mega Bharti 2022

आरोग्य, म्हाडाच्या परीक्षेत झालेला गैरव्यवहार लक्षात घेता राज्यातील शासकीय भरती परीक्षा नामांकित कंपन्यांमार्फत घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीच्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांमार्फत घेण्यात येणार आहेत. यामुळे राज्य शासनातील ७५ हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  सरकारला लवकरच जाहीर करावे लागणार ७५ हजार पदांच्या महाभरतीचे वेळापत्रक, नाहीतर….! State Mega Bharti 2023

TCS, IBPS मार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय 

मागील वर्षाच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे, असे ठरले होते. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया टीसीएस आणि आयबीपीएसमार्फत घेण्याचा निर्णय झाला आहे. या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी व शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येणार आहेत.

State Mega Bharti 2022
State Mega Bharti 2022

Previous Update  –

 नवीन अपडेट – महाराष्ट्र मेगा भरतीचा मार्ग मोकळा, लवकरच होणार भरती सुरु | State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022:  The latest update for State Mega Recruitment 2022. संदर्भ क्र. १० येथील दि.१२.०४.२०२२ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन पदभरतीबाबत खालीलप्रमाणे सुधारित सूचना देण्यात येत आहेत. ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि.११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत, त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेला GR बघावा.

 • ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि.११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत, त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. या प्रमाणानुसार पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसेल तर, किमान एक पद भरता येईल.
 • कोविड -१९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत दि.०४.०५.२०२० चे निबंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे व अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव(व्यय), वित्त विभाग यांच्या उपसमितीने पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२२१००३११०३१९१७०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

GR डाउनलोड करा – https://bit.ly/3rsqQnD

राज्य सरकार 75,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्रीनी केली घोषणा | Rajya Mega Bharti 2022 | State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022 : The latest update for State Mega Recruitment. The State Mega Recruitment 2022 will be soon. There are a total of 75 thousand 257 posts that will be recruited soon in the state including police posts. It also includes seven thousand 231 posts in this department and the recruitment process will start on September 15, reliable sources said. Further details are as follows:-

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ७५ वा वर्धापन दिन (अमृत महोत्सव) होत आहे, त्यामुळे सरकारने ७५ हजार कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जाहीर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणानंतर नाट्यगृहात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ७५ हजार कर्मचाऱ्यांमध्ये प्राध्यापकांची भरती होणारच आहे. जी पदे मंजूर आहेत, त्यांचीच भरती होईल. 

आम्हाला सत्तेत दोनच महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा. दोन महिन्यांपूर्वी आम्ही ‘मोठा कार्यक्रम’ केल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संतपीठ, वसतिगृह विस्तारीकरण, अध्यासन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुलासह विद्यापीठाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांना निधी देण्याचा विचार केला जाईल. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

 • राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे.
 • त्याअनुषंगाने संबंधित विभागांनी १५ दिवसांत आयोगाकडे मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
 • त्यातून जवळपास ११ हजार २६ पदांची भरती होईल.
 • दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाच्या विभागांमधील रिक्त पदांची संख्या वाढल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे.
 • अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांची संख्या कमी झाल्याने पोलिस यंत्रणांवरील ताणदेखील वाढला आहे.
 • या पार्श्वभूमीवर पुढील दीड ते दोन महिन्यांत सरकारकडून ६७ हजार २३१ पदांची भरती होईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी यावेळी सांगितले.
 • पावसाळी अधिवेशात विधानपरिषदेत बोलताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी राज्याच्या शासकीय विभागामधील रिक्त पदांची माहिती देत असतानाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकार ७५ हजार पदांची भरती करेल, असे स्पष्ट केले होते.
 • त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांची सात हजार २३१ पदांची भरती लवकरच होईल, अशी ग्वाही दिली होती.
 • त्यानुसार आता मेगाभरतीचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले आहे.

State Mega Bharti Recruitment 2022

मेगाभरतीचे संभाव्य नियोजन…

 • पोलिस पदभरती – ७२३१
 • ‘एमपीएससी’मार्फत भरती – ११,०२६
 • गट ‘ब, क व ड’ची पदभरती – ६०,०००
 • भरती प्रक्रियेला सुरवात – १५ सप्टेंबरनंतर

डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा

राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा दिवाळीत होण्याची दाट शक्यता आहे. शासकीय पदभरतीची साडेपाच-सहा वर्षांपासून वाट पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून मेगाभरतीचे युध्दपातळीवर नियोजन सुरु आहे. कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास या विभागांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमधील रिक्तपदांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.


मुख्यमंत्र्यांची घोषणा – राज्यात 75 हजार रिक्त पदे भरणार | State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022: Good news for job seekers!! There are a total of 75 thousand posts that will be recruited in the state on the anniversary year of Indian Independence. A review of the vacancies in various departmental establishments in the state is being conducted. Further details are as follows:-

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. जाऊन घ्या या संदर्भातील सविस्तर माहिती  State Mega Bharti 2022

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ७५ हजार पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे.  

State Mega Bharti 2022
State Mega Bharti 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे.

आरे येथेच मेट्रो कारशेड होणार

 • मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेड आरे येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 • ते म्हणाले, आरे येथे वन विभागाची एकूण १२८५ हेक्टर जमीन आहे.
 • त्यामध्ये आणखी ३२६ हेक्टर जमीनीचा वन क्षेत्रात समावेश केला आहे.
 • कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर जमीन लागणार आहे.
 • या जागेच्या तीनही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत.
 • त्यामुळे आरेमधील जागा कारशेडसाठी योग्य आहे.
 • याबाबत मदान समिती आणि सौनिक समितीनेही आरे येथील जागाच कारशेडसाठी उपयुक्त असल्याची शिफारस केली आहे असं त्यांनी सांगितले.
  Update: ७५ हजार पदांची महाभरती IBPS ऐवजी CET सेल घेणार? | State Mega Bharti 2023

राज्यातील गुन्हेगारीत घट

 • राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.
 • त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे.
 • पोलीसांनी मुस्कान अभियानामधून राज्यातील सुमारे ३७ हजार ५११ मुले आणि मुलींचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द केली आहेत.
 • अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

पोलिसांना पंधरा लाखांत घर

 • बीडीडी चाळीचा पुनर्विकास गतीने पूर्ण केला जाईल.
 • या पुनर्विकास इमारतींमध्ये पोलीसांना केवळ पंधरा लाख रुपयांत घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 • पोलिसांना अधिक घरे उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल.
 • पोलिसांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
 • न्यायालयीन विकासासाठी दरवर्षी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील मालमत्ता करात वाढ नाही

 • कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती.
 • आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 • उल्हासनगरमधील १ जानेवारी २००५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली राबविण्यात येईल.
 • त्यासाठी प्रशमन शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे.
 • हे शुल्क प्रति चौरस मीटर २२०० रुपये आकारले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना भरीव मदत

 • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत तात्काळ दिली आहे.
 • पूर्वी ही मदत केवळ पाच हजार रुपये होती.
 • ती मदत आता पंधरा हजार रुपये दिली जात आहे.
 • गावांचे शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाणार आहे असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

महत्त्वाचे – राज्यात 2 लाख 193 पदांची सरळसेवा भरती लवकरच | State Mega Bharti 2022 

State Mega Bharti 2022: There are a total of 2 lakh 193 Direct service and promotion posts vacant in the 29 major departments of the State Govt. 46 thousand 962 posts are vacant in Zilla Parishad.

Further details are as follows:-

राज्य शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदोन्नतीच्या एकून दोन लाख १९३ जागा रिक्त असून त्यात तब्बल ४६ हजार ९६२ जागा जिल्हा परिषदांमधील आहेत. रिक्त पदांमुळे नागरिकांना शासकीय सेवा मिळत नाहीत.  State Mega Bharti 2022

 • तहसील कार्यालयात साध्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठीही विद्यार्थी आणि पालकांना दोन दोन आठवडे प्रतिक्षा करावी लागते.
 • सरकार विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करते, मग शासकीय भरती का केली जात नाही?
 • असा प्रश्न विचारून लवकरच शासकीय भरती करावी अशी मागणी आमदार अरुण लाड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे केली.
 • अरुण लाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, कोविड काळात नोकर भरतीवर निर्बंध आले होते. मात्र आरोग्य विभागातील भरती याकाळात केली आहे.
 • आता एमपीएससीमार्फत आकृतीबंध केलेल्या सर्व पदांची भरती होणार आहे.
 • तसेच जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ५० टक्के पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
 • याच लक्षवेधीमध्ये बोलत असताना आमदार सतीश चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली.
 • ते म्हणाले की, शिक्षक भरतीसंदर्भात सरकारने आढावा घ्यावा.
 • राज्य सरकार मंत्र्यांना एखादे खाते प्रभारी म्हणून देऊ शकते.
 • पण मराठीच्या शिक्षकाला गणित शिकवायला लावू शकते का? तसेच राज्यातील कृषी विद्यापीठात ६० टक्के शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
 • त्या कधी भरणार असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.
 • त्यावर याचा आढावा शिक्षण विभागाकडून घेतला जाईल, असे उत्तर मंत्र्यांनी दिले.

तसेच परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील डाकूपिंपरी येथे अधिकारी आणि वाळू तस्कर यांनी संगनमत करुन शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याची बाब आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे सभागृहासमोर आणली. वाळू माफिया आणि वाळू तस्कर यांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. वाळू कंत्राटदार हे विविध नावाने वाळूचे कंत्राट घेतात. महसूल प्रशासनाकडून वाळू उपसाची जेवढी परवानगी दिली जाते, त्याहून कितीतरी अधिक पटीने वाळू उपसा केला जातो, याकडे बाबाजानी दुर्राणी यांनी लक्ष वेधले. या कंत्राटदाराला प्रशासनाने १ कोटी २८ लाखांचा दंड ठोठावला आहे. हा दंड कधी वसूल करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तरात सांगितले की, संबंधित वाळू कंत्राटदारांना दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच रात्री वाळू उपसा करण्याच्या धोरणाचा राज्य सरकार पुनर्विचार करत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी जेसीबी लावून वाळू उपसा केला जात आहे. बेकायदेशीरपणे हे साहित्य वापरत असल्यास भविष्यात हे साहित्य जप्त करण्यात येईल, असे उत्तर विखे पाटील यांनी दिले.


80,000 Posts – State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022 : There are a total of 80 thousand posts will be recruited soon in the state. Chief Minister Eknath Shinde asserted in a meeting here on Monday that police recruitment will be given priority.

Further details are as follows:-

राज्यात तब्बल 80 हजार रिक्त पदांची नोकरभरती करणार! पोलीस भरतीला प्राधान्य State Mega Bharti 2022

राज्यात विविध विभागांतील रिक्त जागांचा आढावा घेतला आहे. बेरोजगारांना काम मिळण्यासह प्रशासन गतिमान करण्यासाठी ८० हजार रिक्त जागा भरणार आहोत. यात पोलीस भरतीला प्राधान्य देण्यातयेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथील सभेत केले.

 • यावेळी मंचावर माजी मंत्री संजय राठोड, आ. बालाजी कल्याणकर, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. विप्लव बाजोरिया, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते, राजेंद्र शिखरे, राजेश्वर पतंगे, सुभाष बांगर, फकिरा मुंडे, राम कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
 • मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील महिनाभरापासून लोक नावे ठेवत आहेत.
 • मात्र, त्यांना कामातून चोख उत्तर देऊ.
 • जनतेला महायुतीचे उमेदवार म्हणून मते मागितली.
 • बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराने मते मागितली.
 • तो विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत बसणेच योग्य आहे.
 • यात चूक कोणाची, हे जनतेने पाहिले आहे.
 • त्यामुळे जेथे जातोय, तेथे प्रसन्न मुद्रेने लोक स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले.
 • आता डबल इंजिनचे सरकार आहे. केंद्र भरभरून मदत करायला तयार आहे.

१० कोटींचा निधी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमनुरी येथील लमाण देव व आदिवासी भवनाला दहा कोटींचा निधीही जाहीर केला, तर औंढा नागनाथच्या विकासासाठी मंजूर झालेले ६० कोटी लवकरच मिळतील. विपश्यना केंद्र, अन्नप्रक्रिया उद्योग याला चालना देऊ. बाळापूरला तालुकानिर्मितीबाबत सकारात्मक असून, नासाची प्रयोगशाळा केंद्र शासनाकडे मुद्दा मांडून मार्गी लावू, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षण महायुतीच्या काळात दिले होते. नंतर हे प्रकरण आता न्यायालयात आहे. ते मिळण्यासाठी तज्ज्ञांची फौज उभी करू, मात्र, तोपर्यंत मराठा समाजाला विविध फायदे देण्यात येत असल्याचेही शिंदे म्हणाले.


महत्त्वाचे – राज्यात तब्बल 2.79 पदे रिक्त!! शासकीय पदभरती कधी? State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022 : There are a total of 2.79 Lakh State Government posts vacant. However, there has been no recruitment in the last six-and-a-half years. Further details are as follows:-

राज्यातील ३२२ अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी सव्वालाख, तर तीन हजार ३४१ उच्च महाविद्यालयातून साडेआठ लाख आणि डीटीएड, बीएड व व्यवसाय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या (दरवर्षी) ११ लाख आहे. पण, पावणेतीन लाख शासकीय पदे रिक्त असतानाही मागील सहा-साडेसहा वर्षांत पदभरती झाली नाही. त्यामुळे राज्यातील तब्बल दीड कोटींहून अधिक सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात वणवण भटकत असल्याची स्थिती आहे.

 • राज्याच्या ४३ प्रमुख शासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीत दोन लाख ७९ हजार पदे रिक्त आहेत.
 • गृह, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, शिक्षण या विभागांसह जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांची संख्या भरमसाठ वाढली आहे.
 • तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये एकदा ३६ हजार पदांची भरती झाली होती.
 • त्यानंतर पुढील काळात पदभरतीच्या अनकेदा घोषणा झाल्या, पण कधी आरक्षण रद्दमुळे तर कधी विविध प्रकारच्या निवडणुकीच्या आचारसंहितामुळे भरती प्रक्रिया झाली नाही.
 • फडणवीस सरकारने घोषित केलेली ७० हजार पदांची मेगाभरती स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानपरिषद, राज्यसभा, विधानसभा, लोकसभेच्या निवडणूकांमुळे राबविता आली नाही.
 • दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात सत्ताबदल झाला, कोरोनाचे संकटही आले.
 • काही दिवसांपूर्वी राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक पार पडली आणि आता पुन्हा सरकारबदल झाला. पण, मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने पदभरतीसंदर्भात अजूनही काहीच हालचाली दिसत नाहीत.
 • सध्या महाराष्ट्रात ‘अ’ वर्गातील जवळपास ५० हजार, ‘ब’ वर्गातील ७७ हजार आणि ‘क’ वर्ग एक लाख व ‘ड’ वर्गातील ५२ हजार शासकीय पदे रिक्त आहेत.
 • ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा करीत सुशिक्षित तरुणांना सरकारी नोकरीची आशा होती.
 • महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आता तरूणांना शिंदे-फडणवीस सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
  सरकारला लवकरच जाहीर करावे लागणार ७५ हजार पदांच्या महाभरतीचे वेळापत्रक, नाहीतर….! State Mega Bharti 2023

‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण सर्वांनाच लागू

 • राज्यातील मराठा समाजासह अन्य समाजातील मागासवर्गीयांना केंद्र सरकारच्या १० टक्के ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
 • पण, ज्यावेळी मराठा समाजाचे ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द झाले होते, त्यावेळी अनेकांना सरकारी नोकरीत सहभागी करून घेताना ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ देण्याचा निर्णय झाला. त्यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो लाभ मिळणार नसून त्यांना केवळ खुल्या प्रवर्गातूनच संधी मिळेल, अशी माहिती राज्याच्या सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोठी सुवर्णसंधी!! राज्यात महिन्याला एक लाख सरकारी पदांसाठी भरती – State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022: The State Mega Recruitment 2022 will be soon for 1 Lakh government posts. There are a total of 2 Lakh 75 Thousand posts vacant in Maharashtra State. This recruitment will be soon in various government departments like Home Department, Public Health Department, Water Resources and Revenue Department, Medical Education Department, Etc. For more details about State Mega Recruitment, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

कोविडकाळात रखडलेली विकासप्रक्रिया सुरू करण्याच्या सरकारने पावले टाकणे सुरू केले असून, लोकाभिमुख निर्णयांच्या मालिकेतले पहिले पाऊल नोकरभरतीचे असेल. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा, असे आदेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रिक्तपदांची संख्या मोठी असताना विकासकामे मार्गी लागणे अशक्य आहे, असे सांगत भरतीबद्दलचे कागद त्वरेने तयार करावेत, असे आदेशही शिंदे यांनी दिल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

 • महाराष्ट्रात एकूण दोन लाख ७५ हजार पदे रिक्त आहेत.
 • या पदांची आरक्षणनिहाय भरती कशी होईल, याचा आराखडा तयार केला जाणार आहे.
 • देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ३६ हजार पदांची भरती झाली होती.
 • त्यानंतर सरकारबदल आणि कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली.
 • महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार तरुणांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल आदी विभागांचा कारभार अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे प्रभावित झाला आहे.
 • महाराष्ट्रात अ वर्गात ५० हजार, ब वर्गात ७५ हजार, क वर्गात १ लाख आणि ड वर्गात ५० हजार पदे रिक्त आहेत.
 • रिक्त जागा आणि मंजूर जागांचा आढावा घेऊन आरक्षण आणि बिंदूनामावलीनुसार ही भरती करण्यात येणार आहे.

आरक्षणाचे निकष लावून यासंबंधातील जाहिराती तयार करून त्या मंत्रिमंडळासमोर ठेवल्या जाणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. महाविकास आघाडी सरकारनेही यासंदर्भात तयारी चालवली होती. आता ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात दर महिन्याला एक लाख कर्मचाऱ्यांना भरती केले जाईल.

‘भरती कंत्राटी पद्धतीने नको’

 • नोकरभरतीसंदर्भात पावले टाकली जाणे आनंदाचे आहे. कर्मचारी भरती रखडल्यामुळे योग्य प्रकारे कामे होत नाहीत.
 • सरकारने यासंदर्भात त्वरेने पावले उचलावीत, असे आमचे निवेदन होते.
 • भरतीप्रक्रिया सुरू होणार असेल, तर ती आनंदाची बाब आहे; मात्र सरकारने ही भरती नियमित प्रक्रियेनुसार व्हावी, कंत्राटी पद्धतीने होऊ नये. कंत्राटी कामगार फार जबाबदारीने काम करत नाहीत.
 • त्यामुळे सरकार संवेदनशीलपणे वागू शकत नाही.
 • नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भावनेकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा असल्याचे मंत्रालय अधिकारी व कर्मचारी महासंघाचे प्रमुख ग. दि. कुलथे यांनी सांगितले.

State Mega Recruitment 2022 – Vacancy Details 

भरतीचा आराखडा

शिंदे-फडणवीस सरकारला यासंबंधीचा जो आराखडा दिला जाणार आहे, त्यानुसार गृह विभागात १४ ते १५ हजार, सार्वजनिक आरोग्य विभागात २४ हजार (यातील ८ हजार पदांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे), जलसंपदा आणि महसूल विभाग प्रत्येकी १४ हजार, वैद्यकीय शिक्षण १२ हजार, सार्वजनिक बांधकाम ८ हजार आणि अन्य विभागांसाठी १२ हजार ५०० या संख्येत कर्मचारी पहिल्या टप्प्यात भरले जातील. जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठीही कर्मचारी नेमले जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाईल.


State Mega Bharti 2022

State Mega Bharti 2022 : There are a total of 40,35,202 posts sanctioned under Various Ministries and Departments of Central Govt. 10 Lakh employees will be recruited under mission mode in the next one and a half years in many departments and ministries. Further details are as follows:-

मोठी सुवर्णसंधी!! सरकार येत्या दीड वर्षांत सुमारे 10 लाख रिक्त जागा भरणार

केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत माहिती दिली त्यानुसार १ मार्च २०२१ च्या उपलब्ध आकडेवारी नुसार केंद्र सरकार मध्ये विविध विभागांत सुमारे ९. ७९ लाख रिक्त पदे आहेत. तर एकूण स्वीकृत पदांची संख्या ४०. ३५ लाख एवढी आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर विस्तृत माहिती दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • खर्च विभागाच्या पेमेंट रिसर्च युनिटच्या अहवालानुसार मागील वर्षी मार्च पर्यंत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागाअंतर्गत ४०,३५,२०२ एवढी मंजूर पदे होती.
 • तर सद्य स्थितीत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ३०,५५,८७६ कर्मचारी आहेत अशी माहिती एक अहवालातून समोर आली आहे.
 • ”केंद्र सरकारमध्ये (central govt) वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती करण्याची जबाबदारी ही संबंधित मंत्रालय आणि विभागांची आहे.
 • त्याचबरोबर ही एक नियमित चालविली जाणारी प्रक्रिया आहे.
 • त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सुद्धा अनेक विभागांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये येत्या दीड वर्षात मिशन मोड च्या अंतर्गत १० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असं सांगितलं आहे” अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली.

केंद्रातील सर्व विभागांमध्ये ई – कार्यालय प्रणाली

 • बुधवारी लोकसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये ई कार्यप्रणाली किंवा डिजिटल पद्धतीची कार्यलय प्रणाली सुरु करण्यात आली आहे.
 • पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, न्यान विभाग, अर्थ मंत्रालय, कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, प्रशासनिक सुधार आणि सार्वजनिक तक्रार विभागासह अनेक विभागांमध्ये नागरिकांना त्याचे अर्ज किंवा तक्रारी दाखल करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करुन दिले आहे अशी माहिती सिंह यांनी दिली.
 • त्याचबरोबर मंत्रालयामध्ये केंद्रीय रजिस्ट्रीचं काम सुद्धा डिजिटल स्वरूपात करण्यात आलं आहे असंही सिंह यांनी सांगितले

State Mega Bharti 2022

Leave A Reply

Your email address will not be published.