टेट परीक्षेच्या नोंदणीत अडचणी; अर्जात का दुरुस्त करण्याची संधीच नाही – TAIT Exam Registration Process
TAIT Exam Registration Process – Many candidates are facing problems while TAIT Application Form registration process. In Candidates Dashboard there is no options to Edit the details, So candidates are facing the problem after submitting details & Fees payment. More details are given below. Also the Tait website ibpsonline.ibps.in/mscepjan23 working very slow or Not working many times.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता चाचणी (टेट) परीक्षेच्या नोंदणीसाठी उमेदवारांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकदा भरलेला अर्ज दुसऱ्यांदा दुरुस्त करण्याची कोणतीही मुभा त्यासाठीच्या संकेतस्थळावर नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.
विद्यार्थ्यांची सही निळ्या अक्षरात असल्यास हे अर्ज बाद होत आहेत. त्यामुळे या अर्ज सोबत भरलेले शुल्कही वाया जात आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्याना भुर्दंड सोसावा लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली असून त्यामध्ये अर्ज ऑनलाईन दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.
TAIT Exam Registration Process
दुसरीकडे या परीक्षेच्या नोंदणीचे संकेतस्थळ अत्यंत स्लो चालत असल्याने त्याचाही फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन 8 फेब्रुवारीपर्यंत टेट परीक्षेच्या नोंदणीसाठीची मुदत 12 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर यांनी दिली.
विद्यार्थ्याना त्यांचे अर्ज दुरुस्त करता येतील का, यावरही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याना कागदपत्रे सादरीकरणासाठी मुदतवाढ दिली आहे.