https://Mahatait.in

Mahatait

नवीन GR प्रकाशित!! शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पद्धत; दर तीन महिन्यांतून जाहिरात निघणार – Pavitra Portal Shikshak Bharti 2022

0

Pavitra Portal Shikshak Bharti 2022

Pavitra Portal Shikshak Bharti 2022: As per the latest news, The New GR is published by Maharashtra Government 2022. The details about this GR are given below. 

शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी काही सुधारणाही जारी करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. 

राज्यात शिक्षक पदभरतीमध्ये मागील काळात झालेले घोळ टाळण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पवित्र पोर्टलद्वारे सरकारकडून शिक्षक पदभरती करण्यासाठी नवीन सुधारणा केल्या आहेत. याआधी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा संधी उपलब्ध होत्या. यासोबतच आता यामध्ये नवीन नियम जोडण्यात आले असून राज्य सरकराने एक परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे.


Shikshak Bharti Pavitra Portal – Changes 

कार्यपद्धतीमधील बदल आणि सुधारणा खालीलप्रमाणे

  • उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील.
  • उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
  • शिक्षक भरती पदासाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल.
  • तसेच सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आले आहे.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पद भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील.
  • त्यात त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.
  Pavitra Portal Registration Form 2022 Merit List PDF at edustaff.maharashtra.gov.in

नव्याने करण्यात आलेल्या बदलांनुसार आता उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांसाठी शिथिल करण्यात आले आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील, असे या परिपत्रकात म्हटले आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरताना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावेत, या उद्देशाने पवित्र पोर्टलमध्ये हे बदल व सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

New Pavitra Portal GR 2022

पूर्ण GR डाउनलोड करा

भरती घोटाळे ताजे; विश्वासार्हतेवर प्रश्नचिह्न

राज्यात एमपीएससीमार्फत वर्ग १, वर्ग रच्या परीक्षा घेऊन मोठ्या विश्वासाने भरती केली जाते. परंतु, राज्यात शिक्षण, आरोग्य, पोलीस क्षेत्रात भरतीमध्ये घोटाळ्यांचे सत्र सुरु आहे. टीईटीमधील घोटाळा संपलेला नाही. अशात शिक्षक भरतीत पुन्हा गैरप्रकार झाल्यास एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील, असे सुरासे म्हणाले.

Pavitra Portal Bharti 2022

Leave A Reply

Your email address will not be published.