नवीन अपडेट – ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता – Maharashtra Shikshak Bharti 2022 – MahaTAIT
Maharashtra Shikshak Bharti 2022: The latest update for Shikshak Recruitment 2022. As per the latest news, there are a total 31 thousand teachers posts vacant in the state. Further details are as follows:-
आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे व शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील मंजूर असलेल्या शिक्षक आणि शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदे भरती करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विविध विद्यापीठांमधील रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला असला तरीही प्रत्यक्षात एकूण एक हजार १६६ जागा रिक्त आहेत. त्यातील ६५९ जागा भरण्यासाठी मान्यता मिळाली असून उर्वरित ५०७ जागा रिक्त राहणार आहेत. या माहितीचा क्रमवार तपशील खाली दिलेला आहे.
घटनाक्रम –
– राज्य सरकारने २५ मे २०१७ च्या निर्णयानुसार सर्व विभागांतील पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर होईपर्यंत बंदी घातली होती.
– त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली अकृषी विद्यापीठातील शिक्षकीय पदांचा आकृतीबंध सुधारित करण्याची कार्यवाही सुरू झाली
– या काळात सेवानिवृत्ती व इतर कारणास्तव विद्यापीठांमधील अनेक पदे रिक्त झाली.
– शासनाने नेमलेल्या उपसमितीच्या १६ जुलै २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत १५ अकृषी आणि अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर पदांच्या ८० टक्के इतक्या मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता मिळाली.
– उपसमितीने दिलेल्या मंजुरीनुसार ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यात सरकारने मान्यता दिली
– त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत वित्त विभागाने पदभरतीवर निर्बंध आणले
– त्यामुळे ही पदे मान्य होऊनही भरता आली नाहीत.
– कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव पुन्हा वित्त विभागास सादर करण्यात आला
– त्याअनुषंगाने वित्त विभागाने स्थापन केलेल्या उपसमितीच्या १८ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला
– बैठकीत उपसमितीने ६५९ पदे भरण्यास मंजुरी दिली.
– आता राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे आणि सरकार मान्य अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर असलेल्या शिक्षक व शिक्षक समकक्ष अशा एकूण ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिल्याचा अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढला आहे.
मान्यता मिळालेल्या पदांची संख्या –
विद्यापीठाचे नाव : मंजूर पदे : रिक्त पदे : भरतीस मान्यता मिळालेली पदे
- मुंबई विद्यापीठ : ३७८ : २११ : १३६
- एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई : २५८ : १२९ : ७८
- कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक : ४३ : २१ : १२
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : ३३९ : १६० : ९२
- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : ४३ : २० : ११
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : ४६ : १६ : ०७
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : २६२ : १२४ : ७२
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ४०० : १९१ : १११
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद : २७२ :१२८ : ७३
- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : १११ : २८ : ०६
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : १६७ : ५४: २१
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : १२१ : ३७ : १३
- डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे : ५३ : २५ : १४
- गोखले अभिमत विद्यापीठ, पुणे : २४ : १३ : ०८
- टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठ, पुणे : १७ : ०९ :०५
शाळांमध्ये शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसून, सध्या राज्यामध्ये दोन लाख १४ हजार ११९ शिक्षक कार्यरत आहेत. ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या माहितीनुसार; तसेच २०१८-१९च्या पटसंख्येनुसार दोन लाख ४५ हजार ५९१ शिक्षक कार्यरत असणे गरजेचे आहे. यामुळे चार वर्षांपूर्वीच्या संचमान्यतेनुसारही राज्यात ३१ हजार ४७२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या सरकारी शाळांमध्ये एकूण ३१ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- यातील जवळपास २० हजार रिक्त पदे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असून, ही संख्या कशी भरली जाणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
- राज्यात जिल्हा परिषद, महापालिका, कँटोन्मेंट, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारी शाळा चालवल्या जातात.
- राज्य सरकारचा शिक्षण विभाग आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातर्फे या शाळा चालवल्या जातात.
- ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी, शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने या शाळा चालवल्या जात आहेत.
- मात्र, या शाळांमध्ये शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसून, सध्या राज्यामध्ये दोन लाख १४ हजार ११९ शिक्षक कार्यरत आहेत.
- ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या माहितीनुसार; तसेच २०१८-१९च्या पटसंख्येनुसार दोन लाख ४५ हजार ५९१ शिक्षक कार्यरत असणे गरजेचे आहे.
- यामुळे चार वर्षांपूर्वीच्या संचमान्यतेनुसारही राज्यात ३१ हजार ४७२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वर्षी विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकानुसार राज्यामध्ये संचमान्यता होऊ घातली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ काही हजारांमध्ये होणार असल्याने रिक्त पदांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. त्यातच आता शाळांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अशा वेळी शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसतील; तर शैक्षणिक धोरण कसे राबवणार, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यातील प्राथमिक शिक्षक संख्या – Teachers Vacancy
विभाग : मंजूर पदे : कार्यरत पदे : रिक्त पदे
- जिल्हा परिषद : २१९४२८ : १९९९७६ : १९४५२
- महापालिका : १९९६० : ८८६२ : ११०९८
- नगरपरिषद : ६०३७ : ५१३६ : ९०१
- कँटोन्मेंट : १६६ : १४५ : २१
Mahanagarpalika Teachers Vacancy
महापालिकेत ४५ टक्के पदे रिक्त
राज्यातील सर्व महापालिकांमध्ये असलेल्या सरकारी शाळांमध्ये एकूण ४५ टक्के शिक्षकांची कमतरता असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. यामुळे राज्यातील पालिकेच्या शाळांचा गाडा निम्म्याच शिक्षकांकडून हाकला जात आहे. अशा वेळेला शिक्षणाची गुणवत्ता कशी टिकून राहणार, असा प्रश्न उपस्थित होत असून, ही पदे तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.
शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने रिक्त जागा भरणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषद, महापालिकेच्या अनेक शाळा एका शिक्षकाच्या जोरावर सुरू आहेत. असे असेल तर शैक्षणिक गुणवत्ता कशी टिकेल. यामुळेच सरकारी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहेत.
– विजय कोंबे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
Previous Update –
TAIT परीक्षा घेऊन शिक्षक भरती पूर्ण करा-उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश !- Maharashtra Shikshak Bharti 2022
Maharashtra Shikshak Bharti 2022: The latest update for Maharashtra Shikshak Recruitment 2022. As per the latest news, Teacher recruitment Updates are given. Further details are as follows:-
पुढील वर्षी १७ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टिचर्स ॲप्टिट्युट ॲण्ड इन्टेलिजन्स टेस्ट – टीएआयटी) परीक्षा घ्या व त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. यासंदर्भात जितेंद्र सोनकुसरे यांच्यासह चार उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी १ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षक पात्रता चाचणी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट – टीईटी) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परंतु, शिक्षण हक्क कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्र होण्यासाठी टीएआयटी परीक्षाही उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
मागील टीएआयटी परीक्षा २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर ही परीक्षाच घेण्यात आली नाही. करिता, यासंदर्भात राज्य सरकारला आवश्यक आदेश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाची चपराक बसल्यानंतर राज्य सरकारने टीएआयटी परीक्षेचे वेळापत्रक तयार केले. न्यायालयाने ते वेळापत्रक रेकॉर्डवर घेऊन राज्य सरकारला हा आदेश दिला आहे.
या आदेशामुळे राज्यातील हजारो डीएड, बीएड उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. टीएआयटी परीक्षा आणखी लांबली असती तर अनेक उमेदवारांनी वयाची पात्रता गमावली असती. स्वत:ची चूक नसताना केवळ सरकारच्या उदासीनतेचा फटका त्यांना सहन करावा लागला असता, असे याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. प्रदीप क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नवीन अपडेट – शिक्षक भरती पोर्टल रद्द करणार नाही!! – Maharashtra Teachers Recruitment 2022
Maharashtra Shikshak Bharti 2022: शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करा, ही मागणी कदापिही मान्य करणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी शिक्षण संस्था महामंडळाच्या महाअधिवेशनात संस्था चालकांना ठणकावून सांगितले. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती करणार आहोत. आरटीई (राईट टू एज्युकेशन) प्रतिपूर्तीसाठी २०० कोटींची तरतूद केली आहे, त्यांनी सांगितले.
राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवारी सांगलीत धनंजय गार्डन येथे झाले. अध्यक्षस्थानी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे होत्या. पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार फौजिया खान, आमदार सुमनताई पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
खुशखबर! – महाराष्ट्रात ७५ हजार पदांची शिक्षकांची सर्वात मोठी मेगा भरती ! Shikshak Bharti 2022
Maharashtra Shikshak Bharti 2022: As per latest update 50% vacancies of teachers will be filled very soon. The latest update for State Teachers Recruitment 2022. As per the latest news, There are a total of 55 to 60 thousand teacher posts vacant in schools in the state. Teacher recruitment has been closed for the last 10-12 years. Further details are as follows:-
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली. लवकरच राज्यात ७५ हजारांहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती करू, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली. तसेच केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्षात बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचं काम करणार असल्याचं नमूद केलं. यावेळी दीपक केसरकर शनिवारी (२४ सप्टेंबर) सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “शिक्षक भरती करताना राज्यात किती पदं रिक्त आहेत हेही बघावं लागतं. शिक्षक म्हणजे केवळ शिक्षक असत नाहीत, तर त्यांना गणित, विज्ञान असे विषय असतात. ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आम्ही ज्या शाळांना अनुदान देतो तेथेही अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले असतात. त्या सर्वांचं समायोजन करून लवकरच भरती केली जाणार आहे.”
“ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार”
“ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी ७५ हजारांहून अधिक पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष ही पदं भरायची आहे यावर कॅबिनेट बैठकीतही चर्चा झाली आहे,” अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.
“अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामावून घेणार”
“बेरोजगारांना संधी मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि त्यांचे कॅबिनेटमधील सर्व मंत्री अत्यंत दक्ष आहेत. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामावून घेतलं जाईल. खूप दिवसांनी ही भरती होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी हा आशेचा किरण आहे,” असंही केसरकरांनी नमूद केलं.
‘शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन, रिक्त पदांपैकी ५० टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे,’ असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिले. वर्गात शिक्षकांचे छायाचित्र लावण्याऐवजी शाळेतील परिचय फलकावर शिक्षकांचे छोट्या आकाराचे छायाचित्र लावण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्य मंडळात झाली. या बैठकीत केसरकर यांनी शिक्षण विभागातील विविध विभागांचा आढावा घेतला. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे शिक्षकांच्या रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याला अचडण नाही. त्यामुळे ही पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. त्याच वेळी राज्यातील काही शाळांमध्ये दोन विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत आहे, तर काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यातून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांच्या समायोजन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल. शिक्षक भरतीसोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहे.’
विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांची माहिती व्हावी, यासाठी आपले गुरुजी या उपक्रमांतर्गत सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे छायाचित्र वर्गात लावण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, या निर्णयावर शिक्षकांनी संताप व्यक्त केला आणि विरोध केला. त्यामुळे यातून मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. त्याबाबत केसरकर म्हणाले, ‘देशातील इतर राज्यातील तुलनेत महाराष्ट्रात शिक्षकांऐवजी इतर व्यक्ती शिकवण्याचे प्रमाण नगण्य आहे. केंद्राच्या आदेशाप्रमाणे फोटो लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे या निर्णयाबाबत प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यानुसार आता शिक्षकांचे छायाचित्र वर्गात लावण्याऐवजी परिचय असणाऱ्या फलकावर छोट्या आकारात लावण्यात येईल.’
- गेल्या १०-१२ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानीत खाजगी शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत.
- सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत ३१ हजार ५७२ शिक्षकांची पदं रिक्त असून अनुदानीत खाजगी शाळांमध्ये २५ हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत.
- शिक्षक नसतील तर मग सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार? असा प्रश्न भाजप समर्थीत आमदार नागो गाणार यांनी उपस्थित केला आहे.
- महाविकास आघाडी आणि सध्याच्या सरकारचंही शिक्षणाच्या बाबतीत धोरणं सारखचं आहे, असं म्हणत गाणार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
तिजोरीतील पैसा वाचवण्यासाठी आणि कायम विना अनुदानित शाळांना फायदा पोहचविण्यासाठी शिक्षकांची पदं रिक्त ठेवली जात, असल्याचा आरोपही गाणार यांनी केलाय. हे सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळखंडोबा करतंय, मात्र आम्ही शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत राहणार असल्याचं गाणार यांनी सांगितलं.