TAIT चा अर्ज करण्यासाठी 4 दिवस मुदतवाढ – CTET Appear वाले अर्ज करू शकतात – शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी जाहिरात प्रकाशित ; अर्ज सुरु, हि माहिती काळजीपूर्वक भरा !! MahaTAIT Exam 2023

11

MahaTAIT Exam 2023 – Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) – 2022 Notification is OUT. An Online application is starting from 31 January 2023 and it will be end on 8th February 2023.  The information about the vacant posts of education servants/teachers in the state will be published through the computerized system ‘Pavitra’ (Portal For Visible To All Teacher Recruitment) according to the subject, category, medium and point nomenclature. Download Maha TAIT Exam 2023 Notification at below link

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ आहे.. “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे. अधिक माहिती व या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा 


TAIT चा अर्ज करण्यासाठी 4 दिवस मुदतवाढ… CTET appear वाले अर्ज करू शकतात.

MahaTAIT Exam 2023

✅TAIT अर्ज भरतांना हि माहिती काळजीपूर्वक भरा – TAIT परीक्षेबद्दल पूर्ण माहिती !!

  • – राज्य परीक्षा परिषदेमार्फत घोषित केलेल्या या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असून, अर्ज करताना तीन जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करावी लागणार
  • – अराखीव गटासाठी ९५० रुपये आणि राखीव गटासाठी ८५० रुपये शुल्क असून, परीक्षेसाठी प्रवेशपत्र १५ फेब्रुवारीपासून होणार उपलब्ध होणार
  • – मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमात परीक्षा देता येणार असून, मराठी आणि इंग्रजीचे भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक राहणार
  • – राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जानेवारीला या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली असून, ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली.

अर्ज भरताना माध्यम निवडावे लागणार
परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू राहणार आहे. मराठी आणि इंग्रजीचे भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थींना इंग्रजी-मराठी किंवा इंग्रजी- उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाइन अर्ज भरताना निवडावे लागणार आहे.

पहिल्यांदा घेण्यात आलेली परीक्षा देखील ऑनलाइनच घेण्यात आली होती. त्या वेळी संबंधित परीक्षा महापोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आली होती. परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परीषदेकडे नाही, परंतु शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या. त्याच पद्धतीने 22 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान होणारी परीक्षा पार पडणार असून संबंधित परीक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maha TAIT Exam 2023 Hall Ticket Download

प्रवेशपत्र १५/०२/२०२३ पासून ऑनलाईन उपलब्ध असणार आहेत.परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे.

  • परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
  •  सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतः चा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
  • ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
  Teachers Recruitment : जि.प.च्या ३० हजार शिक्षकांची भरती होणार-फेब्रुवारीत ‘टेट’ – MahaTAIT Maharashtra Shikshak Bharti 2022

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test 2022 Time Table

Check Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test Exam Schedule and Online application dates. Save below image in your Phone/pc to get instant Maha TAIT 2023 exam dates.

MahaTAIT Exam 2023
MahaTAIT Exam 2023

उमेदवारांची पात्रता- Educational Criteria For Maharashtra TAIT Exam 2023

१ भारतीय नागरीकत्व
२ वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/शिक्षकांना लागू होईल.
३ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८/प्र.क्र.३९७ / टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुध्दीपत्रक २५ फेब्रुवारी २०१९, १६ मे २०१९, १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. प्रस्तुत जाहीरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६ / टीएनटी-०१, दि. १०/ ११ / २०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणान्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दतः MahaTAIT Application 2022 Process

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
    • (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी
      X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 200X300 pixels
      फाईल साईज 20 kb50kb –
    • (ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 140X60 pixels
      फाईल साईज 10kb 20kb
    • (क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.
      आकारमान 240X240 pixels in 200 DPI
      फाईल साईज 20 kb 50kb
    • (ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 800×400 pixels in 200 DPI
      फाईल साईज 50kb-100kb –
    • स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना
  • “I,_ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
    सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. ( लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतः च्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)
  After gap of 4 years, MahaTAIT postponed

परीक्षेचे शुल्क : MahaTAIT Exam 2023 Application Fees

१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
२. मागासवर्गीय / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे. ४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

जिल्हा / परीक्षा केंद्र निवडः MahaTAIT Exam District Selection

अर्ज सादर करतांना ३ (तीन) जिल्हा / परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. जिल्हा / परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा / परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा / परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.

तर उमेदवारी रद्द!

ऑनलाइन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल, निकाल घोषित केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेली माहिती आणि मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Important Date For Maharashtra TAIT Exam 2023 Online Application

Important EventsDates
Commencement of on-line registration of application31/01/2023
Closure of registration of application08/02/2023
Closure for editing application details08/02/2023
Last date for printing your application23/02/2023
Online Fee Payment31/01/2023 to 08/02/2023

How To Apply For MahaTAIT Exam 2023 

  • To Apply For Maha TAIT you have to click on the below Link Or you can apply on msce pune Website
  • A new Page will open, You have to register first on TAIT Exam
  • After successful registration, you can proceed further by filling out an Online TAIT Application form
  • Pay application fees as given
  • Take a printout of the Application form for future use
  • Apply before the end date

परीक्षा घेण्यासाठी परीक्षा परिषदेने आयबीपीएस या कंपनीची निवड केली आहे. https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/  या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांना ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज भरता येईल. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी ८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. तर १५ फेब्रुवारीपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून घेता येईल.  परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती, कालावधी याबाबतची अधिसूचना http://www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी दहावी, बारावी, पदविका, पदवी आदी शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता, अपंगत्व, राखीव प्रवर्गातील असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेले अद्ययावत रंगीत छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी, स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाइन अर्जात अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षेबाबत पुढील कार्यवाहीसाठी लघुसंदेश, ईमेलद्वारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता अचूक देणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

📝 अर्ज करा

  शिक्षक भरती : अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त अखेर ठरला; जाणून घ्या MahaTAIT Exam 2022

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – आवेदनपत्र वेबलिंक

https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – जाहिरात

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – अधिसूचना

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – आवेदनपत्र वेबलिंक

https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/

Previous Update – (MahaTAIT Exam 2023)

MahaTAIT Exam 2023 – Now the school education department has made it a requirement to pass the Teacher Aptitude and Aptitude Test (TET) to become a teacher of classes I to XII. Be it Zilla Parishad or private-aided schools, new teachers are not given approval without it. This exam will be conducted by the end of February through the Maharashtra State Examination Council. Read More update about MahaTAIT Exam 2023 at below :

३१ जानेवारीला वेळापत्रक : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.

MahaTAIT Exam Time Table 2023

पहिली ते बारावीच्या वर्गांव शिक्षक होण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षक क्षमता व अभियोग्यता चाचणी (टेट) उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. जिल्हा परिषद असो वा खासगी अनुदानित शाळांवरील नवीन शिक्षकांना त्याशिवाय मान्यताच दिली जात नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा आता फेब्रुवारीअखेरीस घेतली जाणार आहे.

२५ मार्चपर्यंत परीक्षा संपवून एप्रिल-मे महिन्यात शिक्षक भरतीला सुरवात केली जाणार आहे. खासगी शाळांना एका पदासाठी दहा जणांना (टेट) बोलावून त्यांच्या मुलाखतीतून शिक्षक भरती करावी लागणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवरील शिक्षक भरती मेरिटनुसार होणार आहे.

मात्र, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण व अमरावतीतील शिक्षक व पदवीधर आमदारकीच्या आचारसंहितेमुळे फेब्रुवारी होणाऱ्या ‘टेट’चे नियोजन १५ दिवस पुढे ढकलण्यात आले आहे.

रीपण, मतदान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होऊन मार्चअखेरीस संपेल आणि त्यानंतर काही दिवसांतच निकाल जाहीर होणार आहे.

जेईई-सीईटीच्या धर्तीवर परीक्षा

‘टेट’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असून जेईई व सीईटीच्या धर्तीवर ‘टेट’ घेतली जाणार आहे. साधारणत: साडेतीन लाख परीक्षार्थी ही परीक्षा देतील असा अंदाज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. दररोज आणि तीन सत्रातील पेपरसाठी प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असणार आहेत.

दररोज तीन सत्रात होतील पेपर

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ‘आयपीबीएस’ व ‘टीसीएस’ या कंपन्यांकडील जवळपास दहा हजार केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन पार पडेल. परीक्षा केद्रांची यापूर्वीच निश्चिती झाली असून दररोज तीन सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे.

वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका असेल आणि पेपर सोडविण्यासाठी परीक्षार्थींना दोन तासांचा वेळ मिळेल. दररोज साधारणत: २५ ते ३५ हजार विद्यार्थी देतील, अशी व्यवस्था परीक्षा केंद्रांवर केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पेरीक्षेची केंद्रे असणार आहेत.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – आवेदनपत्र वेबलिंक

https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/

11 Comments
  1. Sagar shinde says

    Sir I have submitted my application for Tait Exam But I use blue pen for Sign And declaration. So My application will reject or what please Advice

    1. MahaTAIT Admin says

      You can use blue or black pen for signature.
      So no problem, if all information you provided is correct, then the application will be accepted.

  2. RK PAWAR says

    SSC MARKSHEET AS PER NAME FIRST NAME IS SURNAME

  3. Zakikhan Pathan says

    Really Tait online exam form date of filling the form changed from 08/02/2023 to 12/02/2023 Sir ?

  4. Arti Patil says

    Sir मी फॉर्म सासरच्या नावांनी भरला आहे आणि declaration पण त्याच नावानी केलं आहे आणि सही पण.
    परंतु सर अंगठा दिला त्यावर सही माहेरच्या नावाची upload झाली आहे… आणि CTET apperance पण no केलं आहे… तर मी काय करू pls reply sir

  5. Sujata Bagul says

    Sir I have already submitted online form but at that time above new options of appeared for CTET was not available so now I wants to fill that information if there’s anything I can do?

  6. Tejesh Deshmukh says

    sir i have given CTET Exam but still no Result so i am facing problem while filling this form what should i do .

  7. Tejesh Deshmukh says

    Sir, i have Given CTET Exam But Still No result , So i Am Facing Problem While Filling This MAHATAIT Form , What Should i Do ?

  8. Madan says

    Sir Mi CTET exam Dilo ahe but ajun result ala nahi , ha form bharatana CTET Appear var Click kelyavar Result vicharat ahe , pan ajun result lagala nahi , Tyamule Next Window open hot nahi

  9. Inzamam says

    sir I have submitted my application for tait exam but I will fill the CTET percentage information wrongly.
    So can I edit the application ?

  10. Vijay Kisan Ahire says

    I gave tait exam but at the exam center application was with me so in checking time they took from me
    and not gave it back so what can I do? Please reply

Leave A Reply

Your email address will not be published.