सावधान! रिक्त पदांच्या भरतीसाठी बोगस जाहिरात!- सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकर भरतीसाठी अर्ज मागविले जात असल्याचा प्रकार- Nashik Mahanagarpalika Bharti 2023
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 – Finally Nashik Mahanagarpalika has decided that this Recruitment Process will be carried out by IBPS. So Accordingly, the state government has given permission to Nashik Municipal Corporation to fill up 706 vacancies in Medical Health and Fire Department as a matter of urgency. Out Of TCS and IBPS, IBPS proposal has been received. Accordingly, this process will be implemented soon and preparations are underway. Nashik Mahanagarpalika Bharti 2023.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकर भरतीसाठी अर्ज मागविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने कानावर आत ठेवताना, अशी कुठल्याही प्रकारची भरती महापालिकेच्या माध्यमातून होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर जवळपास २८०० पदे रिक्त आहे. त्या व्यतिरिक्त महापालिका ‘ब’ वर्गाच्या दर्जात समाविष्ट झाल्याने त्यानुसार जवळपास १४ हजार पदांचा आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. परंतु, शासनाच्या नवीन नियमानुसार आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असेल तर रिक्त पदे भरता येत नाही.
त्यानुसार नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च जवळपास ४२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. जोपर्यंत पस्तीस टक्के परत खर्च येत नाही, तोपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासनाने स्पष्टपणे नकार दिला आहे. परंतु, मागील दोन वर्षात राज्यात कोरोनाचा सामना करताना मनुष्यबळाची कमतरता भासली.
त्यामुळे राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून अग्निशमन व वैद्यकीय या दोन प्रमुख विभागांचे रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली. परंतु सेवा प्रवेश नियमावलीचा महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने नोकर भरती होऊ शकली नाही. शासनाच्या सूचनेनुसार अग्निशमन विभागातील ३४८ व वैद्यकीय विभागातील ३५८ या एकूण ७०६ पदांसाठी सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी देण्यात आली.
त्यानंतर राज्य शासनाने रिक्त पदांची भरती करण्यासाठी टीसीएस व आयबीपीएस या दोन संस्थांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले. त्यानुसार महापालिकेला आयबीपीएस या संस्थेचा प्रस्ताव प्राप्त झाला.
आयबीपीएस या संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्याची तयारी प्रशासनाकडून केली असतानाच पदवीधर मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नोकर भरतीवरदेखील मर्यादा आल्या आहेत.
‘ॲप’च्या माध्यमातून फसवणूक
आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सामंजस्य करार होऊन नोकर भरतीची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. मात्र, सोशल मिडियाच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
यात महापालिकेत दोन हजार रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी ठराविक लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन करून ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जात आहे. ॲप डाऊनलोड करताना ओटीपी तसेच खासगी माहिती विचारली जात असल्याने यातून बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू असल्याने नोकर भरती करता येत नाही. महापालिकेने आयबीपीएस संस्थेमार्फत वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप संस्थेसोबत करार झालेला नाही. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्रक्रिया पार पडेल. बोगस भरती किंवा अन्य भूलथापांना बळी पडू नये.”
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकांमध्ये मेगा भरती करण्याची घोषणा केल्यानंतर आता महापालिकेत अडीच हजार पदांवर नोकरभरती होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेत सध्या वैद्यकीय व अग्निशमन विभागात ७०६ पदांसाठीची भरतीप्रक्रिया सुरू होणार असून, आता उर्वरित रिक्त असलेल्या १,८०० पदांवरही भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचननेनंतर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासकीय, लेखा, तसेच तांत्रिक पदांसाठीची सेवाप्रवेश नियमावली मंजूर करण्यासाठी नगरविकासकडे आठ दिवसांत प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेत जम्बो नोकरभरतीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. एकीकडे महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला असला तरी सद्यःस्थितीत क वर्गाचाच आकृतिबंध आहे. निवृत्तीमुळे रिक्त पदांची संख्या जवळपास २,८०० पर्यंत पोहोचली आहे. करोना काळात सरकारने अत्यावश्यक बाब म्हणून ८७५ नवीन पदांना सरकारने मंजुरी दिली. मात्र, सेवाप्रवेश नियमावलीचा प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित असल्याने भरतीप्रक्रिया रखडली होती. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवाप्रवेश नियमावली मंजूर केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आयबीपीएस संस्थेसोबत आचारसंहितेनंतर नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुसरीकडे राज्यातील प्रमुख आयुक्तांची बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत प्रामुख्याने नोकरभरतीच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला. त्यात राज्यभरात महापालिका व नगर परिषदांमधील जवळपास ४० हजार पदे भरली जातील, अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अडीच हजार रिक्त पदांवरही भरती होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेत २,८०० पदे रिक्त असून, त्यापैकी ७०६ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली आहे. मात्र, उर्वरित सुमारे २,१०० पदापैकी प्रशासन, लेखा व तांत्रिक संवर्गातील १,८०० पदांबाबत कारवाई करणे गरजेचे असल्याची बाब आयुक्त पुलकुंडवार यांनी नगरविकास विभागाकडे मांडली आहे. त्यामुळे आता या १,८०० पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव आठवडाभरात पाठवला जाणार आहे.
सेवाप्रवेश नियमावलीसाठी पाठपुरावा
सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या आचारसंहितेत ७०६ पदांची भरती अडकली आहे. ही आचारसंहिता चार फेब्रुवारीनंतर संपुष्टात येईल. तोपर्यंत उर्वरित १,८०० पदांसाठीच्या सेवाप्रवेश नियमावली मंजुरीसाठी मंत्रालयात पाठपुरावा केला जाणार आहे. आचारसंहितेच्या आत ही सेवाप्रवेश नियमावली मंजूर झाल्यास एकत्रितपणे अडीच हजार पदांसाठीची भरतीप्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. सध्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०६ मंजूर पदांसाठीची नोकरभरतीची प्रक्रिया सुरू आहे. आचारसंहितेनंतर ही प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाईल, तसेच उर्वरित जवळपास १,८०० पदे भरतीसाठी आवश्यक सेवाप्रवेश नियमावली तयार करून मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पुढील आठवड्यामध्ये पाठवली जाईल.
महापालिकेच्या विविध विभागांतील ७०६ पदांची नोकरभरती प्रक्रिया नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. नोकरभरतीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन अर्थात, आयबीपीएस बरोबर होणारा सामंजस्य करार आचारसंहितेत सापडल्याने मनपाची नोकरभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण ७,२०० इतकी पदे आहेत. परंतु, गेल्या १३ ते १५ वर्षांत महापालिकेत भरतीच झाली नाही. त्यात सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदांची संख्या वाढत गेल्याने कमी मनुष्यबळात सध्या मनपाचा कारभार सुरू आहे. रिक्तपदांची संख्या २,८०० वर आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना मनपा प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य-वैद्यकीय व अग्निशमन या अत्यावश्यक सेवेशी संबंधित विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, सेवाप्रवेश नियमावलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने नोकरभरतीची प्रक्रिया रखडली. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठी सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. राज्य शासनाने नोकरभरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती करत त्यांच्यामार्फत भरतीप्रक्रिया राबविण्याची सूचना मनपाला केली होती. त्यानुसार मनपाने संबंधित दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी आयबीपीएसकडून महापालिकेला प्रस्ताव प्राप्त झाला असून, या संस्थेबरोबर करार करण्यात येणार होता. मात्र पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने करार करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023: अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या (Nashik Mahanagarpalika Bharti 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेचा एकमेव प्रस्ताव सादर झाल्याने याच संस्थेमार्फत भरती केली जाणार असून, साधारण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होईल.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे. मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही.
NMC Recruitment 2023
मात्र, राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते.
NMC Firefighters Medical Recruitment process
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्तपदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे. (Nashik Mahanagarpalika Bharti 2023)
- मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही, मात्र राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.
- त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते.
- त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे.
सदर संस्थेने नाशिक महापालिकेला प्रस्ताव दिला असून, या प्रस्तावाचा अभ्यास प्रशासनाच्या मार्फत सुरू आहे. पुढील आठवड्यात आयबीपीएस संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीनेदेखील प्रस्ताव दिल्यास या मार्फतदेखील विचार होणार आहे. दोन्ही संस्थांमार्फत रिक्त पदांची भरती होईल किंवा महापालिकेला परवडेल, अशा एकाच संस्थेच्या माध्यमातून भरती होईल. जानेवारी महिन्यात रिक्त जागा भरल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
“अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या टीसीएस व आयबीपीएस या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यातील आयबीपीएस संस्थेने प्रस्ताव स्वीकारला आहे.”- मनोज घोडे- पाटील, उपायुक्त, प्रशासन.
NMC Bharti 2023 | Nashik Mahanagarpalika Bharti 2023
Previous Update – Nashik Mahanagarpalika Bharti 2023
नाशिक महापालिकेत नोकरीची उत्तम संधी!! ’86’ पदांच्या रिक्त जागा – NMC Recruitment 2022
Nashik Mahanagarpalika Bharti 2022: NMC (Nashik Municipal Corporation) has recently announced recruitment for the 86 vacant posts. The official website of Nashik Mahanagarpalika is nmc.gov.in. More details are as follows:-
Nashik Mahanagarpalika is going to recruit interested and eligible candidates to fill 86 vacant posts. The applications are invited for the “Obstetrician / Gynaecologist, Anaesthetist, Microbiologist, General Medicine, General Surgeon, Senior Medical Officer, Dentist, Epidemiologist, Staff Nurse, Charge Sister, Lab Technician, Pharmacist, X-ray Technician, Medical Officer” posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates can apply offline & attend the interviews. Nashik Mahanagarpalika Bharti 2023
नाशिक महानगरपालिका अंतर्गत प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ पदांसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 30 नोव्हेंबर 2022 आहे. तसेच इतर पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर मंगळवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
- पदाचे नाव – प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 86 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 150/-
- राखीव प्रवर्ग – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन (एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती (प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी)
- मुलाखतीचा पत्ता –वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002
- अधिकृत वेबसाईट – nmc.gov.in
Nashik Mahanagarpalika Vacancy 2022
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ | 01 पद |
ऍनेस्थेटिस्ट | 01 पद |
मायक्रोबायोलॉजिस्ट | 01 पद |
जनरल मेडिसिन | 01 पद |
जनरल सर्जन | 01 पद |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
दंतचिकित्सक | 01 पद |
एपिडेमियोलॉजिस्ट | 01 पद |
स्टाफ नर्स – महिला | 09 पदे |
स्टाफ नर्स – पुरुष | 01 पद |
चार्ज सिस्टर | 01 पद |
लॅब टेक्निशियन | 23 पदे |
फार्मासिस्ट | 16 पदे |
क्ष-किरण तंत्रज्ञ | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी – अर्ध – वेळ | 27 पदे |
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ | MBBS WITH MD/ MS GYN./ DGO/DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
ऍनेस्थेटिस्ट | MBBS WITH MD ANESTHESIA /DA/DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
मायक्रोबायोलॉजिस्ट | MBBS WITH MD MICROBIOLOGY FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
जनरल मेडिसिन | MBBS WITH MD MEDICINE / DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
जनरल सर्जन | MBBS WITH MS GENERAL SURGERY / DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | MBBS WITH DCH FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
दंतचिकित्सक | BDS WITH 2 YEARS EXP OR MDS (WITHOUT EXP) (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFFERED) |
एपिडेमियोलॉजिस्ट | ANY MEDICAL GRADUATE WITH MPH/MHA/MBA IN HEALTH |
स्टाफ नर्स – महिला | GNM / BSc. NURSING WITH REGISTRATION OF MAHARASHTRA NURSING COUNCIL |
स्टाफ नर्स – पुरुष | GNM / BSc. NURSING WITH REGISTRATION OF MAHARASHTRA NURSING COUNCIL |
चार्ज सिस्टर | GNM / BSC. NURSING WITH REGISTRATION OF MAHARASHTRA NURSING COUNCIL |
लॅब टेक्निशियन | B.Sc, DMLT FROM GOVT. RECOGNIZED INSTITUTE WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFFERED) |
फार्मासिस्ट | B PHARMA/D PHARMA WITH REGISTRATION WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFERRED) |
क्ष-किरण तंत्रज्ञ | TH SCIENCE + DIPLOMA OF X-RAY TECH. FROM GOVT. RECOGNIZED INSTITUTE WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFFERED) |
वैद्यकीय अधिकारी – अर्ध – वेळ | MBBS (PREFERENCE WILL BE GIVEN TO EXPERIENCED PERSON) |
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
Salary Details For Nashik Municipal Corporation Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ | Rs. 75,000/- per month |
ऍनेस्थेटिस्ट | Rs. 75,000/- per month |
मायक्रोबायोलॉजिस्ट | Rs. 75,000/- per month |
जनरल मेडिसिन | Rs. 75,000/- per month |
जनरल सर्जन | Rs. 75,000/- per month |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
दंतचिकित्सक | Rs. 30,000/- per month |
एपिडेमियोलॉजिस्ट | Rs. 35,000/- per month |
स्टाफ नर्स – महिला | Rs. 20,000/- per month |
स्टाफ नर्स – पुरुष | Rs. 20,000/- per month |
चार्ज सिस्टर | Rs. 20,000/- per month |
लॅब टेक्निशियन | Rs. 17,000/- per month |
फार्मासिस्ट | Rs. 17,000/- per month |
क्ष-किरण तंत्रज्ञ | Rs. 17,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी – अर्ध – वेळ | Rs. 30,000/- per month |
NMC Recruitment 2022 – Important Documents
- वयाचा पुरावा
- पदवी / पदविका शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र (टिप: सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये)
- गुणपत्रिका
- कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As Applicable)
- शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
How To Apply For NMC Bharti 2022
- वरील भरतीकरिता एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ या पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
Selection Process For Municipal Corporation Nashik Bharti 2022
- या भरतीकरिता प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी या पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- सदर पदासाठी इच्छुक उमेवारांनी दर मंगळवारी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Details | |
🆕 Name of Department | Nashik Municipal Corporation (NMC) |
📥 Recruitment Details | NMC Recruitment 2022 |
👉 Name of Posts | Obstetrician / Gynaecologist, Anaesthetist, Microbiologist, General Medicine, General Surgeon, Senior Medical Officer, Dentist, Epidemiologist, Staff Nurse, Charge Sister, Lab Technician, Pharmacist, X-ray Technician, Medical Officer |
🔷 No of Posts | 86 Vacancies |
📂 Job Location | Nashik |
✍🏻 Application ModeSelection Process | OfflineWalk-in Interviews |
✉️ Address | Office of the Medical Health Officer, Health Department, Nashik Municipal Corporation, Rajiv Gandhi Bhawan, Sharanpur Road, Nashik 422002 |
✅ Official WebSite | arogya.maharashtra.gov.in |
Educational Qualification For Nashik Municipal Corporation Recruitment 2022 | |
1Obstetrician / Gynecologists | MBBS WITH MD/ MS GYN./ DGO/DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
Anesthetist | MBBS WITH MD ANESTHESIA /DA/DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
Microbiologist | MBBS WITH MD MICROBIOLOGY FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
General Medicine | MBBS WITH MD MEDICINE / DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
General Surgeon | MBBS WITH MS GENERAL SURGERY / DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
Senior Medical Officer | MBBS WITH DCH FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
Epidemiologist | ANY MEDICAL GRADUATE WITH MPH/MHA/MBA IN HEALTH |
Staff Nurse | GNM / BSc. NURSING WITH REGISTRATION OF MAHARASHTRA NURSING COUNCIL |
Charge Sister | ANY MEDICAL GRADUATE WITH MPH/MHA/MBA IN HEALTH |
Lab Technician | B.Sc, DMLT FROM GOVT. RECOGNIZED INSTITUTE WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFFERED) |
Pharmacist | B PHARMA/D PHARMA WITH REGISTRATION WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFERRED) |
X-ray Technician | SCIENCE + DIPLOMA OF X-RAY TECH. FROM GOVT. RECOGNIZED INSTITUTE WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFFERED) |
Medical Officer | MBBS |
Age Criteria For Nashik Mahanagarpalika Jobs 2022 | |
Open Categories | 38 Years |
Reserved Categories | 43 Years |
Nashik Mahanagarpalika Vacancy | |
Obstetrician / Gynecologists | 01 Post |
Anesthetist | 01 Post |
3 Microbiologist | 01 Post |
General Medicine | 01 Post |
General Surgeon | 01 Post |
Senior Medical Officer | 01 Post |
Epidemiologist | 01 Post |
Staff Nurse | 01 Post |
Charge Sister | 01 Post |
Lab Technician | 23 Posts |
Pharmacist | 16 Posts |
X-ray Technician | 01 Post |
Medical Officer | 27 Posts |
All Important Dates For Nashik Municipal Corporation Recruitment | |
⏰ Last Date | 30th November 2022 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nmc.gov.in Recruitment 2022 | |
📑 PDF जाहिरात | https://cutt.ly/lMM2948 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://arogya.maharashtra.gov.in |