https://Mahatait.in

Mahatait

सरकारला लवकरच जाहीर करावे लागणार ७५ हजार पदांच्या महाभरतीचे वेळापत्रक, नाहीतर….! State Mega Bharti 2023

0

State Mega Bharti 2023 : The state government has signed MoUs worth over ₹88,000 crore with 10 companies and investors, this will creat 55 thousand  employment opportunities in the Maharashtra State. So candidates who are unemployed be prepared for this Mega Recruitment 2023 :

देशाच्या स्वातंत्र अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून शिंदे-फडणवीस सरकारने ७५ हजार पदांची शासकीय मेगाभरती होईल, अशी घोषणा केली. पण, घोषणेला महिना झाला तरीदेखील भरतीच्या दृष्टीने काहीच कार्यवाही झालेली नाही. आता महिनाभरात कृती आराखडा तयार करून वेळापत्रक जाहीर करावे लागेल, अन्यथा ही प्रक्रिया निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मागच्यावेळी लोकसभा निवडणूक २३ मे रोजी पार पडली होती. त्यामुळे मे २०२४ मध्ये लोकसभा तर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होईल. तत्पूर्वी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या पावसाळ्यापूर्वी दोन टप्प्यात (९० ते १०० दिवस) निवडणूका होतील.

प्रभागरचनेची तिढा पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातून सुटण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार वरिष्ठ अधिकारी प्रशासक म्हणून पाहत आहेत. त्यांचा मार्च २०२३ मध्ये एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईल. त्यामुळे उन्हाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजेल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.


State Mega Bharti 2023 महाभरती

या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला ७५ हजार पद भरतीचा कृती आराखडा तयार करून वेळापत्रक (जाहिराती) जाहीर करावेच लागणार आहे. नाहीतर, ही भरती आचारसंहितेत अडकेल आणि त्याचा फटका सरकारला बसू शकतो, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

राज्यातील १८ हजार पोलिस भरतीसाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले. हा अंदाज धरून ७५ हजार पदांच्या मेगाभरतीचे नियोजन करावे लागणार आहे. अंदाजित ४० लाखांहून अधिक अर्ज येतील. एका विभागाची परीक्षा एकाचवेळी घ्यावी लागेल. मात्र, सरकारने भरती प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांकडे तेवढे मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध नसल्याची स्थिती त्या कंपन्यांनी यापूर्वी सरकारला पाठवलेल्या पत्रानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारला भरती प्रक्रिया स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी सुरु करावी लागेल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

  शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा!! पदभरती संदर्भात 14 विभागांचे सादरीकरण | State Mega Bharti 2022

उमेदवारांची संपतेय वयोमर्यादा

राज्य सरकारमधील १७ लाख पदे मंजूर पदांपैकी तब्बल पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. तरीपण महसूल, कृषी, शिक्षण, जिल्हा परिषद, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा, राज्य उत्पादन शुल्क अशा महत्वाच्या विभागांमधील पदे तातडीने भरली जाणार आहेत. मात्र, चार वर्षांपासून राज्यातील तब्बल ४० लाखांहून अधिक तरूणांना मेगाभरतीची प्रतीक्षा आहे. भरतीच्या प्रतीक्षेत दरवर्षी हजारो तरूणांची वयोमर्यादा संपुष्टात येऊ लागली आहे. कोरोना काळात ‘एमपीएससी’ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यासाठीच आंदोलन केले होते. त्यामुळे राज्य सरकार फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात मेगाभरती पूर्ण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत अवघ्या दोन दिवसांत महाराष्ट्राशी तब्बल ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. विदेशी गुंतवणूकदारांची भारतातील पहिली पसंती महाराष्ट्रालाच असल्याचे या करारांवरून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. या गुंतवणुकीमुळे राज्यात ५५ हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

State Mega Bharti 2023 महाभरती

जगभरातील गुंतवणूकदार, उद्योगपती, राज्यकर्ते, धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ यांचा वार्षिक मेळा असलेल्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतील महाराष्ट्राच्या दालनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक देशांतील कंपन्या, गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. दावोस परिषदेतून राज्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी परिषदेला निघण्यापूर्वी व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक उद्योगांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण करार

 • पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चून ‘रूखी फूड्स’चा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार. त्यामुळे राज्याच्या अन्नप्रक्रिया क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता.
 • औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ‘ग्रीनको’ नवीनीकरण ऊर्जेचा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प उभारणार. या प्रकल्पामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळणार.
 • महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ‘बर्कशायर- हाथवे’ या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार.
  मुंबईत ‘इंडस् कॅपिटल पार्टनर्स’ यांच्या १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पातून आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाच्या सेवा उपलब्ध होणार.
 • अमेरिकेच्या ‘न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन’चा चंद्रपूरमधील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प (रोजगार १५ हजार)
  बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार.
 • जपानच्या ‘निप्रो कार्पोरेशन’ या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास टय़ुिबग प्रकल्प पुण्याजवळ उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषधनिर्मिती क्षेत्रास चालना मिळणार. २ हजार रोजगारनिर्मितीची शक्यता.
 • ब्रिटनच्या वरद फेरो अलॉईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार २ हजार)
 • इस्रायलच्या राजुरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प (रोजगार १ हजार)
 • पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टिक ऑटोमोटिव्हज् प्रकल्प (रोजगार २ हजार)
 • गोगोरो इंजिनीयिरग व बडवे इंजिनीयिरगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प
  Update: ७५ हजार पदांची महाभरती IBPS ऐवजी CET सेल घेणार? | State Mega Bharti 2023

State Mega Bharti 2023 महाभरती

State Mega Bharti 2023 महाभरती

Leave A Reply

Your email address will not be published.