Teachers Recruitment : जि.प.च्या ३० हजार शिक्षकांची भरती होणार-फेब्रुवारीत ‘टेट’ – MahaTAIT Maharashtra Shikshak Bharti 2022
Maharashtra Shikshak Bharti 2022 : The latest update for Maharashtra Shikshak Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 30 thousand teachers posts will recruit in April. For that, ‘TET’ will be held in February and after the declaration of results in March, the relevant teachers will be directly appointed through the holy portal according to merit before June. Recruitment will be soon. Further details are as follows:-
कमी पटसंख्या (२० पेक्षा कमी) असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये २९ हजार ६०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत ‘टेट’ होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे. राज्यात जिल्हा परिषदेसह पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास ९७ हजार शाळा असून त्यात सव्वादोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या जवळपास १४ हजार शाळांची पटसंख्या २०पेक्षाही कमी आहे.
त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत. मागील चार वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टीईटी तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील. साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे. परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कमी पटसंख्या (२० पेक्षा कमी) असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये २९ हजार ६०० शिक्षकांची तर माध्यमिक शाळांमध्येही अनेक पदे रिक्त आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत ‘टेट’ होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी मेरिटनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे.
‘खासगी’त मुलाखतीद्वारे भरती
टीईटी व टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी देखील ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आहे. भरती करण्यासाठी एका पदासाठी दहा उमेदवारांना बोलावणे आवश्यक आहे. त्यांची मुलाखत घेऊन खासगी संस्थांवर शिक्षक भरती करावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. गुणवत्तेनुसार थेट भरती देखील करण्याचा अधिकार खासगी संस्थांना देण्यात आला आहे. त्याचे रेकॉर्ड संस्थांना जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी जूनपूर्वी मोठी शिक्षक भरती होईल, असेही सांगण्यात आले.
Teachers Recruitment 2022
- राज्यात जिल्हा परिषदेसह पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास ९७ हजार शाळा असून त्यात सव्वादोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- जिल्हा परिषदेच्या जवळपास १४ हजार शाळांची पटसंख्या २० पेक्षाही कमी आहे.
- त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे.
- त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत.
- दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत.
- मागील चार वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही.
- या पार्श्वभूमीवर आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टीईटी तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
- फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील.
- साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे.
- परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.
- परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वासनिय सूत्रांनी दिली.
- परंतु, वित्त व नियोजन विभागाकडून त्याला ‘हिरावा कंदिल’ आवश्यक असणार आहे.
जिल्हा परिषद शाळांची स्थिती
- एकूण शाळा – ६०,९१२
- एकूण विद्यार्थी – ४३,५५,०७०
- शाळांवरील शिक्षक – २,१४,६६०
- रिक्तपदे – २९,६००