List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

0

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam : Each Year Maharashtra Police Exam is conducted to recruit the Best Candidates for Various Position Like Shipai, Head Constable, and Others in Maharashtra Police Department. So Many Aspiring candidates apply for this Job, the selection process is rigorously consisting of Physical tests, Written Exams, Medical tests and Document Verification. The last Process Of the Police Bharti Exam is Very Important because it will be a milestone for many candidates if they can provide Original and Required documents for this recruitment Process. Therefore to make students easier we are giving you a List Of Important Documents Required for the Maharashtra Police Bharti Exam 2022. Candidates can download Police Bharti Documents PDF for Future use and Be ready with all your Important Police Bharti Documents to get your selection confirmed. Check below the List Of Documents For the Maharashtra Police Bharti Exam

Maharashtra Police Bharti Documents 2022

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र पोलीस विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी सर्वोत्तम उमेदवारांची भरती करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र पोलीस परीक्षा घेतली जाते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात, निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होतो. पोलीस भरती परीक्षेची शेवटची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे कारण अनेक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी मूळ आणि आवश्यक कागदपत्रे प्रदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा २०२२ साठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी देत आहोत. उमेदवार भविष्यातील वापरासाठी पोलीस भरती दस्तऐवज PDF डाउनलोड करू शकतात आणि तुमची निवड निश्चित करण्यासाठी तुमच्या सर्व महत्त्वाच्या पोलीस भारती कागदपत्रांसह तयार राहा. महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षेसाठी कागदपत्रांची यादी खाली तपासा

महाराष्ट्रातील विविध विभागातील स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा

  • एच.एस.सी. प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे आवेदन अर्ज भरावेत, नाव बदलेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावांत कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, संबंधित बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत, कागदपत्र व संबंधित ओळखपत्र पडताळणीत सादर करावी.
  Maharashtra Police Bharti 2022 Syllabus PDF Download महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022

New Update on 29th Nov 2022 : पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर आवेदन अर्ज सादर करावयाची मुदत दिनांक १५.१२.२०२२ रोजी पर्यंत वाढविण्यात येत आहे.

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) हे दिनांक ०१.०४.२०२१ ते ३१.०३.२०२२ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर सक्षम प्राधिकारी यांनी, भरतीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत निर्गमित केलेले प्रमाणपत्र वैध राहील.

तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक राआधो- ४०१९/प्र.क्र. ३१/१६-अ, दिनांक १२.०२.२०१९ मधील तरतुदींनुसार दिनांक ०१.०४.२०२१ ते दिनांक ३१.०३.२०२२ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर विहित करण्यात आलेले मुळ प्रमाणपत्र सादर करावे. त्यासाठी क्रिमीलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तथापि, सदरचे प्रमाणपत्र हे दिनांक ३०.११.२०२२ पुर्वीचे असणे आवश्यक आहे.

Validity Recquired For Police Bharti Non Creamy Layer Certificate

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process

✅Maharashtra Police Bharti Physical Test Details PDF Download

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

Non Creamy Layer Certificate for Police Bharti 2022

Non-Creamy Layer Certificate for Police Bharti 2022 documents should be from 1st April 2021 to 31st March 2022. Otherwise the selection will be cancelled. So, now in November 2022, an instruction has been given in the notification that how to remove the previous year documents. A corrigendum in this regard may be announced soon.

महाराष्ट्रात नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट कसे काढावे?

The families whose combined income is less than eight lakhs get Non Creamy Layer Certificate from Maharashtra Government. For this, the candidate has to apply online at the nearest Setu Kendra or on the website of your government. Non Creamy Layer Certificate is issued by Tehsildars.

नॉन क्रिमीलेअरसर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Important documents For Non Creamy Layer Certificate

  • वडील / आई मा. तहसीलदार कार्यालयातील मागील तीन वर्षांचा उत्पन्न दाखला
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • रिन्यू करायचे असल्यास एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

उमेदवारांना प्रमाणपत्राबाबत विशेष सुचना : List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

खालील नमुद केल्यानुसार प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक राहील.

  • शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र.
  • जन्म दाखला.
  • १२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
  • अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.
  • संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
  • समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र.
  • आधारकार्ड (ऐच्छीक).
  • प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
  • मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
  • जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
  • उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणावे
  • उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती तसेच, अलिकडील काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता आणावे.
  •  मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.
  • यास्तव आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करुन नंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी व संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा. नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत.
  • जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे.
  • आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे.
  • सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही
  • आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल. सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील.
  • कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची (अॅप्लीकेशन आयडी नमूद असलेली) प्रत, पोलीस भरतीकरीता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रांची प्रिंट व २ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
  तरुणांनो लागा तयारीला! पोलिस भरतीची मैदानी व लेखी परीक्षा परीक्षेच्या तारखा जाहीर! Police Bharti Physical Exam Date
List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam
As Per Police Bharti Notification 2021

आवेदनामध्ये नमूद वैध कालावधीची सर्व प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वत:चे नांव, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाराची स्वाक्षरी व शिक्का इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांने स्वत: करावी. विहित केलेली आवश्यक ती प्रमाणपत्रे त्रुटी, अपूर्ण अथवा अवैध असल्याचे आढळल्यास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.

Documents needed for Maharashtra Police Recruitment 2022

  • Card Aadhar.
  • Certificate of Residence.
  • 10th Grade Report.
  • 12th Grade Report.
  • Graduation diploma.
  • Diploma of Computer Proficiency.
  • Certificate of Character.

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

Leave A Reply

Your email address will not be published.