तरुणांनो लागा तयारीला! पोलिस भरतीची मैदानी व लेखी परीक्षा परीक्षेच्या तारखा जाहीर! Police Bharti Physical Exam Date
Police Bharti Physical Exam Date
Police Bharti Physical Exam Date : The latest update for Police Bharti Exam Date 2022. As per the latest news, The Department of Home Affairs has planned to start the physical test on December 12th. The written exam will be held in January 2023 after the result of the physical test. The last date to apply for police recruitment is 30th November 2022. for more details about police bharti physical test details, police bharti physical information, police bharti 2022 physical test date are as follows:-
पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे. १२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अर्ज सुरु-पोलीस भरती लिंक सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
⏰१२ डिसेंबर पासून पोलीस भरती ग्राउंड होणार? काय आहेत नवीन निकष ?
⏰अर्ज सुरु –पोलीस भरती सुरु !!- 17,130 पदांची पोलीस भरती !
Police Bharti Exam Date
- राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
- तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या, पण भरती प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही.
- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली.
- आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे.
- उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत.
- दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे.
- प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
- मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत.
- पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे.
- परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे.
- भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.
Police Bharti Written Exam Date
१२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
Police Bharti Exam Date 2022
पोलिस भरतीची स्थिती
- एकूण जागा- १७,१३०
- अर्ज करण्याची मुदत – ३० नोव्हेंबर
- मैदानी चाचणीची तारीख – १२ डिसेंबर
- ‘लेखी’चा संभाव्य महिना – जानेवारी २०२३
नॉन क्रिमेलिअरची चिंता नको…
पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्यासंदर्भातील नॉन क्रिमेलिअर सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने १ एप्रिल २०२१ ते २१ मार्च २०२२ या काळातील नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत असावी, अशी अट घातली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आता ती मुदत संपून गेली अन् तेव्हाचे क्रिमेलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला. काही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देखील दिली. पण, मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमेलिअर भरतीसाठी चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.