३५ हजार शिक्षकांची भरती परीक्षा फेब्रुवारीत ; त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल !! MahaTAIT Exam 2023

2

Maha TAIT Exam 2023 – 

The ‘MahaTAIT’ exam will be held in the state soon in line with teacher recruitment. This exam will be conducted at all online centers in the state. The planning is being done on the assumption that an estimated three lakh candidates will take the exam. This TAIT Exam is scheduled in February Month. Read Further details about Maha TAIT Exam 2023  at below

As many as 65 thousand posts of teachers are vacant in primary, secondary and higher secondary schools in the state. For that, ‘TAIT’ exam will be organized. There will be a single paper based on objective questions of 200 marks for this examination. Two hours time will be given for two hundred questions. As this exam is conducted online mode, the result of the exam will be announced on the same day or next day. This will be very essential for each candidates that there will be No delay in Maha Tait Exam Result 2023. It will be beneficial for them as they don’t have to wait for Their Appointment letter.

शिक्षक होण्यासाठी आता टीईटीऐवजी आता ‘टेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरुण-तरुणी परीक्षा देतील असा अंदाज परीक्षा परिषदेचा आहे.


त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल MahaTAIT

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी टेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोनशे गुणांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच प्रश्नपत्रिका या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणतः दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन केंद्रे सुरू आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील उमेदवारांची बैठक व्यवस्था, याची माहिती संकलित केली जात आहे.

  नवीन GR प्रकाशित!! शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पद्धत; दर तीन महिन्यांतून जाहिरात निघणार – Pavitra Portal Shikshak Bharti 2022

 ‘खासगी’ला मुलाखतीचे बंधन MahaTAIT

खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठे डोनेशन घेऊन शिक्षकांची भरती केली जात होती. आता ‘टेट’मुळे त्याला लगाम लागणार आहे. एका जागेसाठी किमान दहा उमेदवारांना बोलावून मुलाखतीतून त्यांची निवड करणे बंधनकारक असणार आहे. त्याचे रेकॉर्ड शालेय शिक्षण विभागाला द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती ‘पवित्र’मधून मेरिटनुसार होईल.

दोन टप्प्यांत ६५ हजार शिक्षक भरती MahaTAIT

सध्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील २० लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे. त्यामुळे दोन टप्यात शिक्षकभरती केली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी त्यासंबंधीचे नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदे म्हणजेच ३३ ते ३५ हजार पदांची भरती एप्रिल ते मे २०२३ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी भरतीचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.

दहा दिवस ही परीक्षा चालेल MahaTAIT

उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणतः दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरू आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

MahaTAIT.in

2 Comments
  1. Aisha says

    When online registration start for maha TAIT

  2. Shrikant pise says

    When application form will start?
    Exam are near and till now application form not published

Leave A Reply

Your email address will not be published.